SpreadIt News | Digital Newspaper

15 मेनंतर ‘व्हाट्स अँप’ बंद होणार का? ‘प्रायव्हसी पॉलिसी’बाबत झालाय ‘हा’ निर्णय..!

0

जगभरात मोठ्या संख्येनं नेटिझन्स ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करतात. भारतात तर हे प्रमाण प्रचंड मोठे आहे.

जानेवारी महिन्यामध्ये ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने आपल्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’मध्ये बदल केल्याची घोषणा केली. नवीन ‘प्रायव्हसी पॉलिसी’ लागू करण्यासाठी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने सुरुवातीला 8 फेब्रुवारीची ‘डेडलाईन’ दिली होती. तोपर्यंत युजर्सनी नवीन ‘प्रायव्हसी पॉलिसी’चा स्वीकार करणं अपेक्षित होतं.

Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ‘व्हॉट्स अ‍ॅप’ने पुन्हा 15 मे ही नवी ‘डेडलाईन’ जाहीर केली. तोपर्यंत ‘प्रायव्हसी पॉलिसी’ला मंजुरी न दिल्यास संबंधित युजरची ‘व्हॉट्स अ‍ॅप’ सेवा बंद होईल, असं देखील सांगण्यात आलं होतं.

‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या या नव्या पॉलिसीमुळे युजर्सची खासगी माहिती, संभाषण, कॉल लॉग्जची सर्व माहिती ‘फेसबुक’ला दिली जाणार असल्याची शंका घेतली जाऊ लागली. त्यामुळे युजर्सच्या ‘राईट टू प्रायव्हसी’चं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

Advertisement

‘व्हॉट्स अ‍ॅप’कडून युजर्सची माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खुलासा करण्यात आला. तसेच, युजर्सच्या माहितीचा वापर फक्त ‘फेसबुक’साठीच्या मार्केटिंगमध्येच केला जाईल, त्यातही ‘एंड टू एंड चॅट्स’ किंवा कॉल लॉग्जच्या माहितीचा वापर केला जाणार नाही, असं सांगण्यात आलं. मात्र, यामुळे युजर्सचं समाधान होऊ शकलं नाही.

दरम्यानच्या काळात अनेक युजर्सनी थेट ‘व्हॉट्स अ‍ॅप’लाच ‘बाय बाय’ करीत दुसऱ्या ‘मेसेंजर अँप’चा आधार घेतला. युजर्सची वाढती नाराजी आणि स्पर्धक कंपन्यांकडे त्यांचा वाढता ओढा पाहता, अखेर ‘व्हॉट्स अ‍ॅप’ कंपनीने माघार घेतली.

Advertisement

‘प्रायव्हसी पॉलिसी’ आता ऐच्छिक!
15 मेपर्यंत नवीन ‘प्रायव्हसी पॉलिसी’ न स्वीकारणाऱ्या युजर्सचे अकाऊंट बंद करण्यात येणार नसल्याचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 15 मेपासून कोणाचेही अकाउंट डिलीट केलं जाणार नाही. यासंदर्भात युजर्सला तसे ‘रिमाइंडर्स’देखील पाठवले जातील, असे कंपनीने म्हटलं आहे. नवीन ‘प्रायव्हसी पॉलिसी’ स्वीकारण्याचा पर्याय युजर्ससाठी आता ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement