SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल 41 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात खरेदी करण्याची संधी

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेल (Flipkart Big Saving Day) सुरू आहे. यावेळी अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काऊंट दिले जात आहे. Motorola Razr, Galaxy F62, iPhone 11 सह अनेक स्मार्टफोन्सवर तगड्या ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे iQOO 3 हा स्मार्टफोन अवघ्या 24,990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (Flipkart Big Saving Day Sale : Buy iQOO 3 Smartphone worth 41000 Rs in just 11000)

हा फोन खासकरुन मोबाईल गेमर्ससाठी सादर करण्यात आला आहे. हा फोन बर्‍याच खास फीचर्ससह येतो. यात 8 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, क्वाड रियर कॅमेरा, 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, अशी वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग iQOO 3 या शनदार स्मार्टफोनवरील ऑफरची माहिती जाणून घेऊया.

Advertisement

iQOO 3 च्या बेस व्हेरिएंटवर 13,000 रुपयांची सवलत
Flipkart सेलमध्ये iQOO 3 दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याचा बेस व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे, ज्याची MRP 37,990 रुपये इतकी आहे. हा फोन 13,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. म्हणजेच हा फोन 24,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

टॉप व्हेरिएंटवरही 13,000 रुपयांची सवलत

Advertisement

या स्मार्टफोनचं दुसरं व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतं, या फोनची किंमत 40,990 रुपये इतकी आहे. हे व्हेरिएंटदेखील 13000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येईल. म्हणजेच हा फोन 27,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या दोन्ही व्हेरिएंट्सवर 15,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. जर युजर्सनी त्यांचा जुना फोन एक्सचेंज केला आणि संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास आपण दोन्ही व्हेरिएंट्स अनुक्रमे 9,690 आणि 12,690 रुपयात खरेदी करू शकता.

दोन्ही स्मार्टफोनवर HDFC/BOB बँक ऑफर
युजर्सने iQOO 3 खरेदी करताना HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे भरले तर त्यांना 10 टक्के सूट देण्यात येईल. यासह नो कॉस्ट ईएमआय वर देखील हा फोन खरेदी करता येईल. त्याचबरोबर, BOB बँकेच्या डेबिट मास्टरकार्डकद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट दिली जाईल. म्हणजेच डिस्काऊंट ऑफर, एक्सचेंज ऑफर (संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास) आणि HDFC/BOB बँक ऑफरसह हे दोन्ही फोन खरेदी केल्यास तुम्हाला केवळ अनुक्रमे 8,721 आणि 11,421 रुपये द्यावे लागतील.

Advertisement