SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आनंदाची बातमी! डीआरडीओच्या ‘या’ कोरोनावरील औषधाला मंजुरी; ऑक्सिजनची गरज होणार कमी!

दिवसेंदिवस कोरोना चे प्रमाण देशभरात वाढत असताना रुग्णसंख्या आणि मृत्युदर देखील वाढत आहे. भारतासाठी आरोग्य यंत्रणेच्या विविध पातळीवर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे.

रुग्णालये, ऑक्सीजन, बेड, इत्यादी अनेक गोष्टींची कमतरता जाणवू लागल्याने, पर्यायी उपाययोजना काय करता येतील याकडे सरकार लक्ष देत आहे.

Advertisement

डीआरडीओ या संस्थेने कोरोना वरील एक औषध बनवले आहे. त्या औषधाला नुकतीच मान्यता मिळाल्याने देशभरात होणारी ऑक्सिजनची मागणी कमी होईल, असा दावा डीआरडीओ कडून करण्यात आला आहे.

2 डेक्सोय डी ग्लुकोज 2 या औषधाला आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेकडून मंजुरी देण्यात आली आहे.

Advertisement

या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे. हे औषध दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेग अधिक आहे. याचे परिणाम सकारात्मक असून, ऑक्सिजनवर असणारे सध्याचे अवलंबित्व कमी होणार आहे.

सामान्य उपचार पद्धती आणि या औषधाने बरे झालेल्या रुग्णांत या औषधाने रुग्ण 2.5 दिवस लवकर बरे झाले असे आढळून आले आहे.

Advertisement

डीआडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या लाटेमध्ये INMAS-DRDO च्या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. कामामध्ये त्यांना हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्यलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीचं सहकार्य लाभलं. संशोधनात त्यांना 2 डेक्सोय डी ग्लुकोज कोरोना विषाणू विरोधात प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे.

Advertisement

या औषधांची ट्रायल 2 टप्प्यात झाली आहे. विविध रुग्णालयात याचा वापर करून पाहण्यात आला आहे. सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतरच आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement