SpreadIt News | Digital Newspaper

आता कोरोना रिपोर्ट काही सेकंदात मिळणार; कोरोना लढ्यात रिलायन्सने इस्राईलकडून विकत घेतली ‘ही’ जबरदस्त टेक्नोलॉजी..

0

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी इस्रायली संघाला भारतात आमंत्रित करण्यासाठी केंद्राकडून विशेष परवानगी मागितली आहे. ही इस्त्रायली टीम भारतात येऊन रॅपिड कोविड-19 आयडेंटिफिकेशन सोल्यूशनची स्थापना करेल. यामुळे देशात कोरोना चाचणी अधिक सोपी आणि वेगवान होईल.

कोरोनाच्या वाढीमुळे रिलायन्सला भारतात वेगवान चाचणी प्रणाली सुरू करायची आहे, त्यासाठी कंपनी लोकांना प्रशिक्षणही देईल. रिलायन्स इंडस्ट्रीजने इस्त्रायली स्टार्टअप कंपनी ब्रेथ ऑफ हेल्थकडून 1.5 कोटी डॉलर्समध्ये हे सोल्यूशन खरेदी केलं आहे. रिलायन्सच्या अर्जावर ब्रेथ ऑफ हेल्थच्या शिष्टमंडळास त्वरित मान्यता मिळाली आहे.

Advertisement

काही सेकंदातच मिळेल कोरोना टेस्टिंगचा रिपोर्ट –

रिलायन्सच्या अर्जावर ब्रेथ ऑफ हेल्थच्या प्रतिनिधी मंडळाला तातडीची मान्यता मिळाली आहे. भारतात कोरोनाच्या वाढच्या प्रकोपामुळे रिलायन्स हे रॅपिड टेस्टिंग सिस्टम स्थापित करू इच्छित आहे.

Advertisement

कोरोना व्हायरस वाहक आणि रूग्णांना ओळखणारी ही प्रणाली देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यात मदत करेल. असे म्हणतात की कोरोना चाचणी अहवाल काही सेकंदात येईल.

रिलायन्सने जानेवारी 2021 मध्ये ब्रेथ ऑफ हेल्थसह 1.5 कोटी डॉलर्सचा करार केला होता. त्याअंतर्गत रिलायन्सला स्विफ्ट कोविड-19 ब्रेथ टेस्टिंग सिस्टम मिळणार आहे. या रॅपिड टेस्टिंग मशिनद्वारे दर महिन्याला 10 लाख डॉलर खर्च करुन कोट्यवधी लोकांची टेस्ट केली जाऊ शकते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement