कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी “दो गज की दुरी, मास्क है जरुरी!” हे अक्षरशः प्रत्येकाला तोंडपाठ झाले आहे. तरीही अनेकांना आजही मास्क कुठे घालावा? तो कसा असावा? मास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती हेही माहीत नाही.
कोरोना जेव्हापासून जगात आला तेव्हापासून त्याला रोखण्याचे अनेक उपाय शोधले जात आहेत. एका विषाणूने सगळ्या जगाला हैराण केले आहे. अदृश्य असूनही त्याची भीती मनामनात आहे.
अनेक देश लॉकडाऊन आहेत. भारतात तर रोज नवे विक्रम रुग्णसंख्येमुळे होत आहेत. आता कोरोनाची पहिली लाट ओसरून दुसरी लाट आलेली आहे.
या लाटेत काय वेगळे उपाय करून, स्वतःला कोरोना पासून दूर आणि सुरक्षित ठेवता येईल याचा विचार प्रत्येकजण करत आहे.
काही दिवसांपूर्वी दोन मास्क वापरून कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळवता येईल असे बोलले जात होते. अमेरिकेच्या विषाणू आणि संसर्गाशी संबंधित संस्थेचे वैज्ञानिक यांनी यावर भाष्य करत, डबल मास्किंग कोरोना होऊच देणार नाही किंवा टाळेल असे सांगितले नाही.
मात्र, 90% प्रमाणात विषाणू तुमच्या नाका-तोंडापर्यंत पोहोचण्यात डबल मास्किंग अडथळा ठरू शकते. याने संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते, असे सांगितले आहे.
नाक आणि तोंडाला व्यवस्थित फिट बसणारा मास्क वापरणे आणि त्यावर आणखी एक त्याच पद्धतीचा मास्क परिधान करणे दुप्पट प्रमाणात उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले आहे.
अमेरिकेच्या कॅरोलीना विद्यापीठाच्या एमिली सिकबर्ट या प्राध्यापिका म्हणतात, सर्जिकल मास्क अनेक लोक वापरतात ते हवेचे योग्य प्रकारे वहन व्हावे या दृष्टीने तयार केलेले असतात. मात्र, ते सैल असतात त्यामुळे कोरोना काळात चेहऱ्यावर व्यवस्थित बसणारे मास्क वापरावे. ज्यातून समोरच्याच्या थुंकीचे थेंब, बोलताना निघणारे तुषार आपल्या नाकापर्यंत जाणार नाहीत.
दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणुचे नवे म्युटंन्ट्स समोर आले आहेत. त्यासाठी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या लाटेत डबल मास्किंग गरजेचे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u