Take a fresh look at your lifestyle.

18 वर्षांखालील मुलांवर कोरोना लस अद्याप उपलब्ध नाही, मग पालकांनो मुलांची काळजी ‘अशी’ घ्या…

0

कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोका लहान मुलांनाही निर्माण झाला आहे. आई-वडिलांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील लहान मुलांना बाधा होऊ नये, म्हणून शेजारी किंवा नातेवाइकांकडे पाठविले जात आहे आणि यामुळेच ही लहान मुलेच कोरोना स्प्रेडर ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

आई-वडिलांच्या संपर्कात आल्यानंतर कालांतराने मुलांनाही कोरोना होत आहे व त्यांच्यामुळे इतरांनाही संसर्ग होत आहे. परिणामी मुलांवर उपचार करण्यासाठी त्यांची धावपळ उडते. त्यामुळे पालकांनी काळजी घेऊन मुलाबाळांनाही आपल्याच सोबत ठेवून योग्य उपचार घेण्याची गरज आहे.

Advertisement

पहिल्या लाटेतही लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळत होता, पण प्रमाण कमी होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे प्रमाण जास्त आहे. विशेषतः मार्च महिन्यापासून लहान मुलांत कोरोनाचा अधिक संसर्ग दिसून येत आहे.

5 दिवसांतच मुले येऊ शकतात पॉझिटिव्ह

Advertisement

आपल्या घरातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना 5 दिवसांनंतरही बाधा होण्याची शक्यता असते. आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर मुले पूर्णपणे ठणठणीत आहेत, असे समजून त्यांना बाधा होऊ नये म्हणून इतरत्र पाठविले जाते; पण पाच दिवसांनंतरही रोगप्रतिकारक शक्ती कमी असली की, या मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना इतरत्र पाठवून कोरोनाचा संसर्ग वाढविण्यापेक्षा घरीच ठेवणे फायदेशीर ठरणारे आहे.

पालकांनो तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी ?

Advertisement

ज्या पालकांना कामासाठी बाहेर जावे लागते त्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी किंवा लहान मुलांशी संपर्क अधिक येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

2 वर्षांवरील मुले खेळण्यासाठी, वाढदिवस आदी कारणांसाठी बाहेर जात असतील तर त्यांना मास्क घालायलाच हवा. हात स्वच्छ धुणे, अंतर राखणे यासारख्या गोष्टींची त्यांना सवय लावायला हवी.

Advertisement

सामान्यतः ताप आला आणि तो तीन दिवसांनंतरही उतरत नसेल त्याचप्रमाणे अन्य लक्षणे जर दीर्घकाळ दिसत असतील तर या मुलांची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यानंतर तर त्यांना रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू व्हायला हवेत. उशीर केल्यास त्यांची प्रकृती गंभीर होते व त्यांना बरे होण्यासही अधिक कालावधी लागतो.

पालक तसेच 18 वर्षांवरील व्यक्ती लस घेऊ शकतात, मात्र लहान मुलांसाठी अद्याप अशी लस आलेली नाही. त्यामुळे लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होणे आवश्यक आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

Leave a Reply