SpreadIt News | Digital Newspaper

💁🏻‍♀️ मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार सुरू- एकनाथ शिंदे

👨🏻‍⚖️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर, महाराष्ट्रात मराठा समाजाची नाराजी सरकारने ओढवून घेतली आहे. विरोधक आक्रमक होऊन सरकारवर टीका करत असताना, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत विचार सुरु असल्याचे आशादायी वक्तव्य केले आहे.

◼️दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातला कायदा रद्दा केला तो दिवस सगळ्यांसाठीच काळा ठरल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. ते सध्या सोलापूर दौऱ्यावर असून सोलापुरात त्यांच्या हस्ते 1000 खाटांच्या कोव्हिड केअर सेंटर चे उदघाटन करण्यात आले त्यावेळी मराठा आरक्षणावरील प्रश्नावर त्यांनी सविस्तर माहिती दिली.

Advertisement

💬 “झालेला निर्णय मराठा समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. निकालाचा दिवस सगळ्यांसाठीच काळा दिवस ठरला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न केले गेले. उच्च न्यायालयात जी वकिलांची टीम होती, त्यामध्ये अजून वकिलांची फौज वाढवली. पण दुर्दैवाने निकाल विरोधात गेला”, असं ते म्हणाले.

ℹ️ राज्य सरकारने पारित केलेला कायदा रद्द करतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भातले अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचं देखील यावेळी स्पष्ट केलं आहे.

Advertisement

👉 राज्य आणि केंद्र सरकार असा विचार न करता, जर अधिकार केंद्राला आणि राष्ट्रपतींना असेल तर अवश्य सर्वांनी एकत्रित यावर काम करावे असेही ते बोलले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार म्हणून आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असेही ते बोलले.

👍 मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement