कोरोना महामारीने भारतात सध्या रुग्णांचा उच्चांक गाठला आहे. कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण दिवसाला 4 लाखाच्या जवळपास आहे. हजारो रुग्णांचा रोज कोरोनाने मृत्यू होत आहे.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुद्धा घोषित केला आहे. विविध जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगवेगळे विक्रम नोंदवत आहे. लसीकरण, लॉकडाऊन, निर्बंध या सगळ्यात ऑक्सिजन, बेड, हॉस्पिटल या गोष्टीचा तुटवडा भासत आहे.
अनेक लोकांनी आपले आप्तस्वकीय यात गमावले आहेत. आपले माणूस गमावल्याने दुःखाचा डोंगर अनेक घरांवर आहे. अनेक लोक हे दुःख घेऊन आयुष्यात पुढे जायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही लोक हे अतीव दुःख सहन न झाल्याने टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत.
राजस्थानात बाडमेर मध्ये अशीच हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. जयराम दास नावाच्या व्यक्तीला कोरोना झाला आणि काही दिवस ते हॉस्पिटल मध्ये दाखल सुद्धा होते.
मात्र, कोरोनाविरुद्ध असणारी लढाई ते हरले आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायची वेळ आली. त्यांच्या चितेला अग्नी दिल्यावर काही सेकंदात त्यांच्या 30 वर्षीय मुलीने त्या चितेत उडी घेतली.
या मुलीचे नाव चंद्रकला असून, ती यात 60 टक्के भाजली आहे. तिने उडी घेतली तेव्हा तिच्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, ती तोपर्यंत खूप भाजली होती.
तिच्यावर दवाखान्यात उपचार होत असून तिची प्रकृती नाजूक आहे. या घटनेने बाडमेर गावात एकच हलकल्लोळ माजला आहे. सर्वत्र याच घटनेची चर्चा असून काही जण हळहळ व्यक्त करत आहेत तर काही जण ही गोष्ट चुकीची झाली असल्याचे बोलत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u