पब्जी गेमने लहान-मोठा प्रत्येकजण वेडा झाला होता. या गेमचे व्यसन अनेकांना लागले होते असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अनेकांना तर यातून इतके वेड लागले की, गेम हरला तर लोक अगदी जीव देखील द्यायला उतरले आणि अनेकांनी दिलेही.
मोबाईल गेम पब्जी चे जर तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पब्जी भारतात परत कमबॅक करणार असून, नव्या नावाने आणि नव्या ढंगाने आपल्या युजर च्या भेटीला हा गेम येणार आहे.
भारत आणि चीन दरम्यान झालेल्या तणावाच्या वातावरणामध्ये भारत आणि चीन च्या ॲप वर बंदी घातली होती. ॲप्स भारतातून हद्दपार केल्यानंतर पब्जी वर देखील बंदी घालण्यात आली.
त्यामुळे पब्जी ची आवड असणारे बरेचसे युजर्स नाराज झाले होते. चीनला देखील याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळेच, आता हा गेम नव्या नावासहित भारतात लॉन्च होणार आहे.
बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया या नावाने लवकरच मोबाईलवर हा गेम लाँच होणार आहे. नव्या फिचर्ससह हा गेम लाँच होणार असून,त्यात गेमची स्वतःची एस्पोर्ट इकोसिस्टीम असणार आहे. यात लीग आणि टुर्नमेंट इत्यादी सज्जता असेल.
हा गेम मोबाईल डिव्हाईस वर फ्री टू प्ले उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे गेमर्स चा डेटा यात सुरक्षित राहणार आहे. भारत सरकारच्या सर्व नियमांचे पालन हा गेम करेल असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u