SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ASUS चा ‘हा’ नवा स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर, कोणत्या गोष्टींमुळे असेल खास ? वाचा सविस्तर..

भारतीय बाजारात ASUS ZenFone 8 Pro लवकरच लाँच केला जाऊ शकतो. अलीकडेच ASUS फोनचं मॉडेल नंबर ASUS_I007D सोबत या फोनला BIS प्रमाणपत्रदेखील प्राप्त झालं आहे. ज्यावरून कळतंय की, हा फोन लवकरच भारतीय बाजारात बाजारात लाँच केला जाऊ शकतो. अशी माहीती आहे की, या फोनचं नाव ASUS झेनफोन 8 प्रो असं असू शकतं.

‘असा’ असू शकतो हा स्मार्टफोन..

Advertisement

एक महत्त्वाची बाब आधीपासूनच स्पष्ट आहे की, ZenFone 8 सिरीज तीन मॉडेल्ससहित 12 मे रोजी जागतिक बाजारात लाँच केली जाईल.

त्यात ZenFone 8 Mini, ZenFone 8 आणि ZenFone 8 Pro यांचा समावेश केला जाऊ शकतो.

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार फीचर्स-

झेनफोन 8 प्रोच्या स्पेसिफिकेशनबद्दल कोणतीही माहिती नसली तरीही या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह 120 हर्ट्झ 5.92 इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

Advertisement

समोर आलेल्या अहवालांनुसार, ZenFone 8 Mini मध्ये 5.92 इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असेल. या डिस्प्लेमध्ये सेल्फी स्नॅपरसाठी पंच होल कटआउट दिली जाणार आहे.

कॅमेरा सेटअपमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे, ज्यात 64MP सोनी आयएमएक्स 686 प्राइमरी सेन्सर आणि दुसरा सोनी आयएमएक्स 663 सेकंडरी कॅमेरा लेन्स असेल.

Advertisement

या फोनच्या प्रोसेसरबद्दल अधिक बोलायचं झालं तर त्यामध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये 16 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement