कोरोनाची तिसरी लाट एन्ट्री मारणार? तीव्रता किती असू शकते; केंद्राचे मुख्य वैद्यकीय सल्लागार म्हणतात..
भारत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी सध्याची परिस्थिती पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिला आहे. मात्र ती कधी आढळणार आणि तिची तीव्रता किती असणार हे माहित नाही.
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये कहर पसरवताना पाहायला मिळतेय. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतच धापा टाकणाऱ्या भारताच्या आरोग्य यंत्रणेसाठी आणि देशवासियांसाठी हा तिसऱ्या लाटेचा इशारा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी दिला आहे.
‘ही संभाव्य तिसरी लाट कधी येईल आणि तीव्रता किती असेल’, हे आज सांगू शकत नाही. मात्र आम्हाला तयारी ठेवावीच लागेल,’ असे राघवन यांनी आज स्पष्टपणे नमूद केले. देशात आजही दररोज 2.4% या प्रमाणात नवे रुग्ण वाढ वाढत आहेत. सध्याच्या लाटेची तीव्रता पुढच्या महिनाभरात ओसरू लागेल, असा अंदाजही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या लाटा व नुकसान
पहिली लाट : मागच्या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात 17 सप्टेंबर 2020 ला 97 हजार 860 इतके सर्वाधिक रुग्ण देशात आणले होते. दोन महिन्यांनी ही लाट ओसरून 46 हजारांवर दैनंदिन रुग्णसंख्या आली होती.
दुसरी लाट : मार्च महिन्याच्या सुरुवातीला एक मार्चला देशात 12,270 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले होते. नंतर 1 एप्रिलला ही संख्या 75 हजारांवर गेली. एप्रिल महिना संपता संपता 30 एप्रिलला दैनंदिन रुग्ण संख्या 4.02 लाखांवर गेली होती.
महाराष्ट्र कोव्हिड-19 टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी सांगतात..
तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती गंभीर असेल हे पाहावं लागेल. याचं कारण, व्हायरस म्युटेट (बदलत) होत राहणार. महाराष्ट्रात डबल म्युटंट, तर बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट आढळून आला आहे.
डॉ. शशांक जोशी यांनीदेखील महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक स्वतः कडे काळजीपूर्वक लक्ष देणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. लक्षणं असली तर घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे, असं ते म्हणतात.
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात..
भारतामध्ये सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याइतकी स्थिती अजून आलेली नाही. देशातील 50 ते 60 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झालेल्या असतील तर लोकांमुळे सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. मात्र भारतात अद्याप ती वेळ आलेली नाही, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.