SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

3 मे ते 31 मे या काळापुरती तुमची सावली देखील सोडणार तुमची साथ; जाणून घ्या ‘झिरो शॅडो डे’ बद्दल!

आपल्याला आयुष्यात साथ देणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांपैकी आपली सावली ही कायम आपल्या सोबत असते. परिस्थिती कशीही असू दे कोणी सोबत असो व नसो आपली छाया आपली कधीच पाठ सोडत नाही. मात्र हीच सावली आता गायब होणार आहे, असे सांगितले तर तुम्हाला खोटे वाटेल.

तर महाराष्ट्र मध्ये 3 मे ते 31 मे या कालावधीमध्ये विविध शहरांमध्ये ‘झीरो शॅडो डे’ अशी परिस्थिती येणार आहे. म्हणजे तुमची सावली गायब होणार आहे! ही घटना नेमकी काय आहे? याविषयी आपण जाणून घेऊ! त्याचबरोबर आपल्या शहरांमध्ये अशी परिस्थिती कधी उद्भवणार आहे? हे कसे तपासायचे? हेदेखील आपण या लेखामध्ये जाणून घेऊ:

Advertisement

भूगोलामध्ये आपण नेहमी खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून धडे वाचलेले असतात. त्याचा अभ्यास करताना पृथ्वीचा अक्ष हा साडेतेवीस अंशांनी झुकलेला असून तो सरळ लंब नाही असे अनेकदा वाचले आहे. याचाच परिणाम म्हणून पृथ्वीवर विविध ऋतू बदलतात. दिवस रात्रीच्या वेळा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक गावानुसार वेळेमध्ये काही सेकंदाचा फरकही असतो.

सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन भागांमध्ये पृथ्वीवर वेळा ठरवल्या जातात. सूर्य बरोबर डोक्यावर आला किंवा 50 अंश सरकला म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो असे होय. प्रत्येक उभ्या असलेल्या वस्तूची सावली तिच्या पायाखाली अशावेळी येत असते. काहीवेळा ती नाहीशी होते.

Advertisement

यालाच खगोल शास्त्रीय पद्धतीने शून्य सावली दिवस म्हणतात. तुमच्या शहरात हा अनुभव कधी घेता येईल याची माहिती खालील लिंकवर आहे! दुपारी 12-12:15 वाजता तुम्ही तुमच्या शहरासाठी ठरलेल्या दिवशी या घटनेचे साक्षीदार होऊ शकता.

त्यासाठीची लिंक:  https://alokm.com/zsd.html

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement