SpreadIt News | Digital Newspaper

‘या’ कारणांमुळे आयपीएल करावी लागली रद्द, नेमकं चुकलं कुठं?

0

आयपीएलच्या 14व्या सत्रात खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर यां खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि स्टाफमधील इतर दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली.

आता काल मंगळवारी हैदराबादकडून खेळत असलेला ऋद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहीती आहे.

Advertisement

नेमकं चुका कुठे झाल्या..?

2020 साली दुबईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये रेस्टराटा या कंपनीने बायो-बबल ही विशेष संकल्पना चांगल्या पद्धतीने सांभाळली होती.

Advertisement

ट्रॅकिंग डिव्हाईस आणि बायो-सिक्युर वातावरणात कामाचा सुरेख अनुभव होता, असं सांगण्यात येत आहे. मात्र बायो-बबल सांभाळावयाची जबाबदारी स्थानिक पातळीवर सोडण्यात आल्याची कळतंय. हॉस्पिटल्सचे व्हेंडर्स आणि टेस्ट करणाऱ्या लॅब यांच्या हातात या प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली.

विमान प्रवास हा सहा शहरांमधला झाल्याने कारणीभूत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माहीतीनुसार, दोन खेळाडू आणि एका सदस्याला विमानतळावरून प्रवास केल्यामुळे कोरोनाची लागण झाली.

Advertisement

आयपीएल टिम्सने खेळाडूंना विमानतळाच्या टर्मिनसवरून नेण्याऐवजी धावपट्टीवरून थेट हॉटेलमध्ये नेण्याची संमती मागितली होती, ज्यामुळे त्यांचा विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांशी आणि प्रवाशांशी संपर्क येणार नाही, परंतु वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारने याला परवानगी दिली नाही, ज्यामुळे टीमचा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात यायचा धोका वाढला. युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये कोणत्याही टीमने विमान प्रवास केला नव्हता.

खेळाडूंना देण्यात आलेली ट्रॅकिंग डिव्हाईसही खराब असल्याचं समोर येत आहे. ही ट्रॅकिंग डिव्हाईस चेन्नईतल्या एका कंपनीकडून घेण्यात आली होती. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात कोण आलं, याची माहिती हे ट्रॅकिंग डिव्हाईस देणार होतं, पण हे डिव्हाईस सदोष असल्यामुळे अचूक माहितीही मिळाली नाही.

Advertisement

याबरोबरच टेस्टिंग, क्वारंटाईन व बबलच्या बाहेर असणाऱ्या स्पर्धा चालवण्यासाठी गरजेच्या असलेल्या व्यक्तींच्या प्रोटोकॉलबाबतही शंका होती. यामध्ये मैदान कर्मचारी, हॉटेल कर्मचारी, मैदानातले आचारी, नेट बॉलर, ड्रायव्हर हे देखील सामील होते.

मागच्या आठवड्यापर्यंत टीमना बाहेरून जेवण मागवायला परवानगी देण्यात आली होती. तसंच बीसीसीआयने प्रत्येक टीमला त्यांचे खेळाडू, सदस्य, कर्मचाऱ्यांचं बबल तयार करायला सांगितलं होतं, पण संपूर्ण स्पर्धा आयोजित करणाऱ्या आयएमजीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली नाही.

Advertisement

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती, तरीही बीसीसीआयने आयपीएल भारतात खेळवण्यास आग्रह धरला, पण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि फ्रॅन्चायजींनी स्पर्धा मागच्यावर्षीप्रमाणेच यंदाही युएईमध्ये खेळवण्यात यावी, अशी मागणी केली होती.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement