आयपीएलचा यंदाचा सीजन गाजत असतानाच कोरोनाच्या लाटेने आयपीएल मधील विविध टीमच्या प्लेयर सानी कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाल्याने, अचानक सीजन स्थगित करावा लागला.
क्रिकेट म्हटलं की, बेटिंग नावाचं जाळं त्याच्याभोवती आपोआपच विणलं जातं. हा सीजन स्थगित झालेला असला तरी देखील, यामध्ये चाललेल्या बेटिंगचे घबाड नेमके उघड झाले आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वरच्या सफाई कर्मचाऱ्याला या बेटिंग मध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली नुकतीच अटक करण्यात आली आहे. हा सफाई कर्मचारी बुकी बरोबर संगनमत करून ग्राउंड वरची प्रत्येक अपडेट त्याला देत होता, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
नेमकं हे प्रकरण कसे उघडकीस आले? आणि हा सफाई कर्मचारी कशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचे अपडेट बुक्की पर्यंत पोहोचवत होता, ते आपण जाणून घेऊ!
आयपीएल मधील भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख शब्बीर हुसेन यांनी या प्रकाराची माहिती देताना सफाई कर्मचारी ज्याच्या गळ्यात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा पास होता.
हा व्यक्ती ग्राउंड मध्ये उभा राहून सुरु असलेल्या बॉल टू बॉल अपडेट बुकीला देत असे. टीव्हीवर होणारे प्रक्षेपण आणि लाइव्ह मॅच मध्ये काही सेकंदाचा फरक असतो. याचाच फायदा घेऊन हा बुकी बेटिंग करत असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली.
या सफाई कर्मचाऱ्याला जेव्हा भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्याने पाहिले आणि त्याला तू फोनवर कोणाशी बोलत आहे? असे विचारले. त्यावेळी त्याने मी माझ्या प्रेयसीला बोलत आहे, असे सांगून मोबाईल मागितल्यानंतर मात्र तिथून पळ काढला.
याच गोष्टीने त्याच्यावर संशयाची सुई फिरली. त्याचे दोन्ही मोबाईल त्याने ग्राउंड मध्ये टाकले आणि तो जेव्हा पळत सुटला. तो पळाला तरी त्याची सर्व माहिती आपल्याकडे आहे असेही ते म्हणाले. दिल्ली पोलिसांकडे हे दोन्ही मोबाईल देण्यात आले असून त्यातूनच हा मोठा गौप्यस्फोट झाला असल्याचे शब्बीर हुसेन यांनी सांगितले आहे.
दोन दिवस खोट्या ॲक्रेडीशन पासच्या साह्याने हे लोक ग्राउंड मध्ये दाखल होण्यात यशस्वी झाले. त्यातून हा सगळा प्रकार घडला असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व माहिती आणि कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्त केली असल्याने लवकरच या लोकांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यशस्वी होतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u