SpreadIt News | Digital Newspaper

‘2 चा पाढा म्हण…’ नवरीची भरमंडपात नवरदेवाकडे मागणी; नवरदेवाला झाली पळता भुई थोडी!

0

भारतीय संस्कृतीमध्ये वर्षांनुवर्षे लग्नासारख्या कार्यामध्ये मुलींकडून अपेक्षा ठेवल्या जातात. पूर्वीच्या काळी तिचे कमी वयात लग्न व्हावे, तिने घर गृहस्ती व्यवस्थित सांभाळावी, उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू नये, चूल आणि मूल एवढेच तिचे विश्व आहे, अशा अनेक अपेक्षा ठेवल्या जात!

मुलगी बघायला आल्यापासून ते लग्न होईपर्यंत तिच्या चालण्या-बोलण्यात, उठण्या बसण्यात, एक ना अनेक बऱ्याच चुका काढून लग्न मोडले देखील जात. नंतर काळ बदलला. मुली शिकल्या मात्र, तरी देखील अनेक लोक खासकरून अरेंज मॅरेज असेल तर मुलीकडून आणि तिच्या घरच्यांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवतात.

Advertisement

मुलीला चष्मा आहे इथपासून, ते मुलगी मुलापेक्षा जास्त शिकलेली आहे इथपर्यंत कोणत्याही कारणाने आजही आपण लग्न मोडताना पाहतो. हुंडाबळी ही तर वेगळीच समस्या आहे.

मात्र, या सगळ्यात जेव्हा भारतासारख्या देशात एखादी नवरी नवऱ्या मुलाकडून अगदी क्षुल्लक अपेक्षा ठेवते आणि ती त्याला पूर्ण करता येत नाही ते मग काय फजिती होते हे आज आपण बघणार आहोत.

Advertisement

उत्तर प्रदेश मधल्या लखनऊ येथील एका छोट्याशा गावामध्ये लग्न समारंभ सुरू होणार होता. त्याच वेळी नेमके नवरीला नवऱ्या विषयी एक माहिती कळाली आणि तिने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.

या सगळ्यात तिने लग्नसाठी वरमाला हातात घेऊन उभी राहिलेली असताना, हार घालायच्या आधी तिने नवऱ्या मुलाला ‘2 चा पाढा म्हण’ अशी अट ठेवली.

Advertisement

त्याला आधी हा चेष्टेचा विषय वाटला मात्र, जेव्हा ती गांभीर्याने मोठ्याने त्याला ‘दोन चा पाढा म्हण’ असे खणकून म्हणाली त्यावेळी त्याचे धाबे दणाणले.

दोन्हीकडच्या लोकांचे यावरून वाद सुरू झाले. आपल्याकडे मुलींनी कोणता प्रश्न विचारला किंवा तिने अटी ठेवलेल्या तशाही चालत नाहीत. आणि खेड्यापाड्यांमध्ये तर ही उद्धटपणाची गोष्ट समजून मुलीला दोष दिले जातात.

Advertisement

मात्र हा विषय मुलाच्या शिक्षणाचा होता. त्यामुळे, घरच्यांनी देखील तिला साथ दिली. तो एका मागे एक पाढे म्हणण्याची मागणी होत असताना देखील पाढा म्हणायला तयार झाला नाही. तिथेच तो शिकलेला नसल्याचे समोर आले.

मुलीने अडाणी मुलाशी लग्न करायला नकार दिला. दोन्ही बाजूला ही गोष्ट स्पष्ट झाली आणि मुलीच्या आई वडिलांच्या डोक्यात आपण मोठ्या अडचणीतून सुटलो असे आले. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना दिलेले दागिने आणि गिफ्ट्स परत करण्याचे मान्य केले.

Advertisement

म्हणून पोलीस तक्रार झाली नाही. मुलीच्या भावाने मात्र, आपल्या बहिणीने समाजाची भीती न बाळगता धाडसी निर्णय घेतल्याचे कौतुक वाटते सांगत अभिमान व्यक्त केला.

फसवणूक कशीही होऊ शकते मात्र, ऐनवेळी अशा कोणत्याही फसवणुकीला डोळे झाकून सामोरे जाण्यापेक्षा स्वतःच्या भविष्याचा विचार करून असे धाडसी निर्णय मुली जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आपल्या देशातील परिस्थिती सुधारणार नाही.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement