कोरोना काळात कोरोनाशी लढण्यासाठी इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती हा शब्द सर्वांच्या तोंडी आहे. इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. अंडी नेमकी किती, कशी खावीत याबाबत जाणून घेऊ या..
अंडी खाताना आपल्याला खूप गोष्टींची काळजी घेणं आवश्यक
प्रोटिनचा प्रमुख स्त्रोत अंडी – प्रोटिन, व्हिटॅमिन डी, ए, B12 आणि सेलेनियमचा स्त्रोत म्हणून अंडी खाल्ली जातात. त्यामुळे अंडी रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. पण हे करताना काय काळजी घ्यायची?
अंड्याचे सेवन ‘असं’ करू नका- मिळालेल्या माहीतीनुसार, अनेकदा लोक कच्चं अंड फोडून बल्क आहे तसाच खातात, पण हे शरीरासाठी घातक असतं. कच्च्या अंड्यातील अनेक भागात प्रोटीन विखुरलेलं असतं, त्याची निर्मिती अशा प्रकारे होते की ते एकमेकांमध्ये मिसळलं जाऊ शकत नाही.
अंड्याचा आहारात समावेश करताना- कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने अंड्याचे सेवन करु इच्छित असाल तर ते उकडून खावे. तसेच कमी तेलात ऑम्लेट करून किंवा निम्मे शिजवून सेवन केलं तरी चालेल.
अंड्याचा बलक- डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एका अंड्यात सुमारे 373 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल असते. एका व्यक्तीने एका दिवसांत केवळ 300 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल सेवन करणं योग्य आहे. कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अंड्यातील पिवळे बलक खाणे टाळावे. अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटिन अधिक आणि कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असतं.
एका दिवसात- 2 ते 3 अंडी सेवन करा एका निरोगी व्यक्तीने 1 दिवसांत 2-3 अंडी खावीत. ज्या व्यक्तींना मधुमेह अथवा ह्दयविकाराचा त्रास असलेल्यांनी फक्त 1 अंडं प्रतिदिन सेवन करावं.
मायक्रोवेव्हमध्ये अंडी शिजवताना- अंडी शिजवणे वा गरम करणे यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करु नका. अंडी जास्त प्रमाणात उकडवली किंवा फ्राय केली तर त्यातील अँटी ऑक्सिडंटचं प्रमाण कमी होतं.
अंडी स्टोअर करताना अंडी खूप उष्ण हवामान असेल तर अंडी लवकर खराब होतात. अशा वेळी तुम्ही अंडी फ्रिजमध्ये ठेवू शकता. कारण रुम टेम्परेचरमध्ये अंड्यात बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता जास्त असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs