Take a fresh look at your lifestyle.

कोरोना रुग्णांवर होणार आता आयुर्वेदिक उपाय, सरकार म्हणतंय, ‘हे’ आयुर्वेदिक औषध घ्या..

0

देशात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अनेक औषधांचा वापर केला जात आहे. आता यात आयुर्वेदिक औषधाचाही समावेश झाला आहे. आयुर्वेदिक औषध आयुष-64 कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. AYUSH- 64 या 1980 साली तयार करण्यात आलेल्या औषधाची निर्मिती मलेरियावर उपचारासाठी करण्यात आली.

कोरोना झालेल्या रुग्णांमधील बरेच लक्षणं पाहता कोरोना रुग्णांवरही या औषधाची चाचणी करण्यात आली. त्यावेळी हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं. हे औषध सर्वांना उपलब्ध व्हावं, यासाठी आता सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Advertisement

भारतातील आय़ुष मंत्रालयाने सांगितलं, सौम्य-मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे औषध फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी हे औषध परत तयार करण्यात आलं आहे.

आयुष-64 या औषधाचं आता प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतलं जाणार आहे. CCRAS आणि NDRC यांनी संबंधित करारही केला आहे. आयुष मंत्रालायने देशातील सर्वच राज्यांना या औषधाचा सौम्य ते मध्यम कोरोना रुग्णांसाठी वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. देशात हे औषध उपलब्ध व्हावं यासाठी औषध कंपन्यांनीही या औषधाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्यास प्रयत्न सुरू केले आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

Leave a Reply