SpreadIt News | Digital Newspaper

53 रुपयांच्या शेअरवर 1300 पट ‘रिटर्न’; पहा कोणती कंपनी देतेय इतका परतावा?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिक होरपळून निघत असताना, त्याचे परिणाम शेअर बाजारातही दिसत आहेत. भांडवली बाजारात रोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम शेअर बाजारावर (Share Market) दिसत असून, दुपारी 360 अंकांच्या घसरणीसह बाजार सुरु होता. सध्या विचारपूर्वक बाजारात एंट्री करण्याची गरज असल्याचं मत शेअर बाजारातील प्रमुख गुंतवणूकदारांनी व्यक्त केलं.

Advertisement

कोरोना संकट काळात बंगळुरुच्या एका कंपनीचा व्यवसाय मात्र तेजीत सुरु आहे. या कंपनीचं नाव आहे, ‘सबेक्स लिमिटेड’ (Subex Ltd). ‘सबेक्स’चा एक शेअर 53 रुपयांचा आहे, तर त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 1300 टक्के परतावा मिळत आहे.

‘सबेक्स’चं नेमकं काम काय?
बंगंळुरु येथील ‘सबेक्स’ ही सॉफ्टवेअर कंपनी आहे. ‘कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ला ‘डिजीटल सपोर्ट’ (Digital Support) देण्याचं काम कंपनी करते. डिजीटल अर्थव्यवस्था वाढतेय. त्यानुसार कंपनीचा विस्तार होत आहे. ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना व्यावसायिक व्यवहार सुरक्षित आणि योग्य प्रकारे करण्यात मदत करते.

Advertisement

53 रुपयांवर ‘शेअर ट्रेडिंग’
सबेक्स कंपनी शेअर बाजारात 53 रुपयांच्या स्तरावर ट्रेडिंग (Share Trending) करत आहे. कंपनीनं त्यांच्या ग्राहकांना एका महिन्यात 43 टक्के, तीन महिन्यात 112 टक्के आणि एका वर्षात 1253 टक्के रिटर्न दिला आहे. तीन वर्षांमध्ये कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यक्तींना 600 टक्के परतावा मिळाला आहे. शेअर मार्केटमधील कंपनीची ‘मार्केट कॅप’ 3 हजार कोटी रुपये आहे.

सबेक्स लि. कंपनीच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकली असता, जून 2020च्या तिमाहीत कंपनीला 88 कोटींचं उत्पन्न मिळाल्याचं दिसतं. सप्टेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 93 कोटी आणि डिसेंबरच्या तिमाहीत उत्पन्न मिळालं आहे. कंपनीला जून 2020 पासून अनुक्रमे 15 कोटी, 12 कोटी आणि 8 कोटींचा फायदा प्रत्येक तिमाहीत झाला आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement