SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारीच! आता लसीकरण केंद्राची माहीती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार, त्यासाठी काय करायचं? वाचा..

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे, पण योग्य काळजी घेऊन तशी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होऊन देखील म्हणावा असा परिणाम होताना दिसत नाही, कारण लोक आवश्यक कारण नसतानाही घराबाहेर पडून नियमांचं उल्लंघन करतात. देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3,92,488 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहीतीनुसार..

Advertisement

गेल्या 24 तासांत देशभरात 3,689 लोकांचा मृत्यू, काल संसर्गातून 3,07,865 लोक बरे झाले. देशात सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 33,49,644 वर गेली आहे.

या परिस्थितीत 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून आपण कोरोना लसीकरण केंद्राचा शोध घेत असाल तर तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोच होणं गरजेचं असतं, म्हणून…

Advertisement

‘या’ स्टेप्स फॉलो करा..

▪️ तुमच्या ठिकाणी जवळपास कुठे कोरोना लसीकरण चालू आहे, याची माहीती MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅपवर देईल.

Advertisement

▪️ MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या पोस्टनुसार वापरकर्त्यांना 9013151515 वर ‘नमस्ते’ असं पाठवावं लागेल.

▪️ यानंतर चॅटबॉट आपल्याला त्वरित स्वयंचलित (ऑटोमॅटिक) प्रतिसाद देईल व त्यानुसार तुम्हाला 6-अंकी पिन कोड टाकावा लागेल.

Advertisement

▪️ लसीकरण केंद्रांच्या यादीसोबत MyGovIndia चॅटबॉटमध्ये आपल्याला कोविड-19 लस नोंदणीची लिंक मिळेल, जी आपल्याला थेट कोविनच्या वेबसाईटवर घेऊन जाईल.

▪️ या वेबसाइटला भेट देऊन, आपण आपला फोन नंबर, ओटीपी आणि आयडी प्रूफ नंबर प्रविष्ट करुन नोंदणी करू शकता. आपण आरोग्य सेतु ॲप आणि कोविड सर्व्हिस पोर्टल किंवा उमंग ॲपवर जाऊन नोंदणी देखील करू शकता.

Advertisement

▪️ हेल्प डेस्क हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांना सपोर्ट करतो. तसेच एखादी व्यक्ती हिंदीमध्ये संदेश पाठवून भाषा सेट करू शकते. MyGovIndia ने आपल्या ट्विटर हँडलवर या बद्दल माहिती दिली आहे आणि संपूर्ण प्रक्रिया देखील स्पष्ट केली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement