SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

येत्या महिनाभरात सोन्याचे दर 60 हजारांपार जाण्याची शक्यता; ‘ही’ आहेत त्यामागील कारणे!

सोन्याचे दर हे शेअर बाजारासाठी त्याबरोबरच सामान्य माणसांसाठी देखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. हे दर वाढले किंवा कमी झाले तर त्याचा परिणाम समाजाच्या खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यावर होत असतो. कारण प्रत्येकजण गुंतवणूकीचे साधन म्हणून थोड्याफार प्रमाणात सोने खरेदी करत असतो. सध्या देशात सोन्याचा दर हा 46 हजार 743 इतका आहे.

गेल्या आठवड्यात या दरात 1 हजार 15 रुपयांची घसरण नोंदवली होती. मात्र, आता येत्या काळामध्ये 60 हजारांच्या वर सोन्याचे दर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे असणारी काही महत्त्वाची कारणे आज आपण जाणून घेऊयात:

Advertisement

1. कोरोना महामारी : सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये कोरोना ने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. याच कारणाने, सोन्याच्या किंमती देखील सतत खालीवर होताना दिसत आहेत. अशा स्थितीमध्ये गुंतवणूकदारांसाठी सुद्धा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. याचाच परिणाम म्हणून सोन्याचे दर सतत कमी जास्त प्रमाणात बदलताना दिसत आहेत. याच कारणामुळे येत्या काही दिवसात 60 हजारांवर हे दर जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2. चीनची सोने साठवणूक : यामागे चीनची मध्यवर्ती बँक सतत सोन्याचा साठा वाढवण्यात कल दाखवत आहे, हे देखील एक कारण आहे. इथल्या इतर बँकांना देखील सोने आयातीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे साठा होत असल्याने सोन्याच्या किमतींमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

Advertisement

3. डॉलर आणि रुपयात सतत घसरण : डॉलर आणि रुपयामध्ये होणारी सततची घसरण आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याला मोठ्या प्रमाणात तेजी देत आहे आणि त्यामुळे सोन्याचे दर हे आता येत्या काळात गगनाला भिडताना पाहायला मिळतील.

4. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची तेजी : आपल्याकडे गेल्या आठवडाभरात सोने घसरले असले तरी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र सोन्याची तेजी कायम आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात किमती वाढतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1773 डॉलर इतकी आहे. 1 एप्रिल रोजी अमेरिकेत सोन्याचा दर प्रति औंस 1,730 डॉलर इतका होता.

Advertisement

5. किरकोळ आणि घाऊक बाजारातील किंमतीत वाढ : किरकोळ आणि घाऊक बाजाराने देखील गेल्या आठ वर्षांमध्ये सर्वाधिक उच्चांक गाठण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे, या बाजारांमधील किमतीचा देखील सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊन सोन्याच्या किमती वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement