SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन; अचानक इंग्लंडला रवाना

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत रौद्र रुप घेऊन आली, त्यामुळं कोविशिल्ड लसीच्या वाढलेल्या मागणीची पूर्तता करताना तणाव निर्माण होत असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. भारतात त्याच परिस्थितीत परतायची इच्छा नसल्यामुळं लंडनमध्ये अधिक काळ राहत असल्याचं पुनावाला म्हणालेत.

Advertisement

“सर्वकाही माझ्या खांद्यांवर आलं आहे, पण असं आहे की, मी एकटा काहीही करू शकत नाही. तुम्ही जर तुमचं काम करत असाल आणि त्यात केवळ एखाद्या अमक्या, तमक्याच्या गरजा पूर्ण करू शकला नाहीत म्हणून ते काय करतील याची कल्पना तुम्हाला नसेल”, अशा परिस्थितीत लंडनहून भारतात परत येण्याची इच्छा नाही, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, प्रत्येक जणांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची आक्रमकताही तशीच आहे. प्रत्येकाला वाटते त्यांना लस मिळावी; पण एखाद्याला आधी का मिळायला हवी हे कोणीही समजून घेत नसल्याचं पुनावाला म्हणाले.

Advertisement

भारताबाहेरही लसीचं उत्पादन सुरू करता यावं हेही त्यांचं लंडनला येण्यामागचं एक कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबाबत पुढील काही दिवसांत घोषणा होईल असंही ते म्हणाले. जगात इंग्लंडसह 68 देशांत आम्ही लसीचा पुरवठा सुरू केला. पण गेल्या काही आठवड्यांत भारताची स्थिती प्रचंड खराब झाली. एवढं वाईट होईल हे देवालाही माहिती नसेल असंही पुनावाला म्हणाले.

लसीच्या किंमतीबाबत बोलताना सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही आजही सर्वात स्वस्त लस असल्याचं म्हटलं. अलिकडेच गृहमंत्रालयाने सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पुनावाला यांनी Y सिक्यूरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते. CRPF द्वारे त्यांना ही सुरक्षा देण्यात येणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement