SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देवेंद्र फडणवीस यांना चिडवले, नाशिकमधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या विधानावरून, तर कधी वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्यावर टिपण्णी करण्याचे काम सोशल मीडियावर सुरु असते. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही सतत सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते. नुकतेच एका प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना चिडविण्यात आले. त्यामुळे ५ जणांविरुद्ध पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत.

नाशिक येथील कोविड रुग्णालयात पाहणीसाठी गेले असताना, काही जणांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियातुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याप्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांनी 30 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेच्या ‘बिटको’ कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. फडवणीस यांच्यासोबत गिरीश महाजन हेही उपस्थित होते.

बिटको रुग्णालयात प्रवेश करत असताना काही जण देवेंद्र फडवणीस यांना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या प्रकारचा व्हिडीओदेखील बनवला. फडणवीस हे आढावा घेत असताना, काही जण व्हिडिओ काढून देवेंद्र फडवणीस यांना चिडवत होते. हे या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय.

Advertisement

व्हिडिओमध्ये देवेंद्र फडवणीस यांच्यावर शिवराळ टिप्पणी करण्यात आलीय. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन 2 दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावरही अनेकांनी या प्रकारचा निषेध केला आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement