SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोजक्या स्वरूपात लसीकरण सुरू, राज्याला मिळालेत अवघे ‘इतके’ डोस!

राज्यात आजपासून (ता.1 मे) 18 ते 44 वयोगटासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. मात्र, लसींचा पुरवठा कमी असल्याने राज्यात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात मोजक्या स्वरुपात आज लसीकरण सुरु होणार आहे.

एकूण तीन लाखांपैकी मुंबई, ठाणे आणि पुण्याला प्रत्येकी 20 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. नगर जिल्ह्याला १० हजार डोस मिळाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 10 हजार, 7500 आणि 5000 डोस, असे वाटप करण्यात आलं आहे.

Advertisement

लसीकरण मोहिमेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की “राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार आहे. यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही तयारी आहे. परंतु, लसीची उपलब्धता मर्यादित असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लगेच 1 मे पासून लस केंद्रांवर गर्दी करु नये.”

कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल, त्या दिवशी जाऊन लस घ्यावी. राज्याची लसीकरणाची क्षमता रोज 10 लाख एवढी असली, तरी या वयोगटासाठी फक्त 3 लाख डोस राज्याला मिळाल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली.

Advertisement

मुख्यमंत्री म्हणाले, “राज्य शासनाने ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात 6 कोटी नागरिक आहेत. त्यांना प्रत्येकी 2 डोस म्हटले, तरी 12 कोटी लसींची आवश्यकता आहे. आपण दररोज 10 लाख लोकांचे लसीकरण करु शकतो, एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे. परंतु लस वितरण हे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरप्रमाणे केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे.”

लस केंद्रावर गर्दी करु नये

Advertisement

राज्याला उपलब्ध होणारी लस ही मर्यादित आहे. त्यामुळे थेट लस केंद्रावर जाऊन गर्दी करु नये. लसीकरण केंद्रे ही कोविड प्रसाराची केंद्रे होऊ नयेत, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. राज्याला जसजशी लस उपलब्ध होईल, तसतशी सर्व नागरिकांना लस देण्याची सुनियोजित व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

 

Advertisement