SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हिटलरच्या मृत्यूपूर्वीचे ते पाच दिवस; करत होता आत्महत्येची तयारी?

जर्मनीचा हुकूमशहा हिटलर हा आपल्या क्रूरतेसाठी आणि अमानवी कृत्यांसाठी इतिहासात उल्लेखला जातो. त्याने जर्मनी मध्ये असणाऱ्या ज्यू लोकांची हत्या आणि त्यांना संपवण्यासाठी रचलेले कट, त्याचबरोबर जर्मनीवर हुकूमशाही गाजवण्यासाठी त्याचा असलेला अट्टाहास, या सगळ्या गोष्टी आपण इतिहासात वाचल्या आहेत. त्यानुसारच आपल्याला हिटलर चा मृत्यू हा त्याने आत्महत्या केल्याने झाला हेही माहित आहे.

मात्र, आत्महत्येपूर्वी पाच दिवस तो आत्महत्याची तयारी करत होता. हे कोणालाच ठाऊक नसेल त्याचबरोबर त्याने आत्महत्या का केली? हे देखील मोठे गुढ आहे आणि तेच आपण आज या लेखामध्ये उलगडणार आहोत!

Advertisement

‘युद्ध जिंकेपर्यंत बर्लिन सोडून जाणार नाही आणि जिंकलो नाही तर आत्महत्या करेल’ असे तो म्हणाला होता. हिटलर हट्टी होता. बोलले ते खरे करायचा त्याचा स्वभाव त्याला घातक ठरला.

मृत्यूपूर्वी त्याने आपली प्रेयसी इव्हा हीच्याशी लग्न करायचे ठरवले. 29 एप्रिल रोजी त्याने रजिस्टर मॅरेज करत पार्टी ठेवली. वॉल्टर व्हॅगनर या व्यक्तीने त्याचे लग्न लावले. तो सर्टिफिकेट घरी विसरून आला. जेव्हा तो पुन्हा हिटलर कडे येऊ लागला तेव्हा सोव्हिएत सैन्य गोळीबार करत होते. तो कसाबसा हिटलर कडे पोहोचला. 29 एप्रिल ला रात्री 12 च्या पुढे त्याचे इव्हा बरोबर लग्न झाले. मात्र सर्टिफिकेट वर तारीख चुकून 29 च राहिली.

Advertisement

आत्महत्या करण्यापूर्वी 200 लिटर पेट्रोलची सोय हिटलर करून गेला होता. त्यात त्याचा आणि इव्हा चा मृतदेह जाळण्यात यावा अशी त्याची योजना होती.

क्रूर हुकूमशहा म्हणून नावारूपाला येत असलेला हिटलर हा त्याच्या शेवटच्या क्षणामध्ये प्रचंड निराश होता. सोव्हिएतच्या सैनिकांनी चहुबाजूने घेरल्यावर त्याला आपली सत्ता जाणार याची जाणीव होऊ लागली होती. आपल्या घराच्या 50 फुटी खोल बंकर मध्ये तो स्तब्ध मात्र, भीतीच्या अवस्थेत लपून बसला होता.

Advertisement

परिसरात असलेली चान्सलरी बाग सोव्हिएत सैन्याने उध्वस्त केली होती. 25 एप्रिल रोजी त्याने आत्महत्या करायचे ठरवले. त्याने आपला अंगरक्षक हिंज लिंगे याला बोलावून आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती दिली.

‘माझ्या मृत्यूनंतर चान्सलरी बागेत माझा मृतदेह नेऊन तो जाळून टाक. माझे कपडे, कागद, वस्तू या देखील जाळ. फक्त माझे तैलचित्र तसेच ठेव. माझा ड्रायव्हर ते बर्लिन शहराबाहेर नेईल’ असे त्याने सांगितले.

Advertisement

2 वाजता मृत्यू च्या दिवशी दुपारी तो शेवटचे जेवला. गाढ झोपला. झोप झाल्यावर आवरले आणि आपल्या पत्नीला घेऊन एका खोलीत गेला. बाहेर अंगरक्षक उभा होता. हिटलर आणि त्याची पत्नी इव्हा ब्राऊन यांनी गोळी झाडून घेऊन सायनाईडची गोळी घेऊन 30 एप्रिल 1945 रोजी आयुष्य संपवले.

शेवटच्या 5 दिवसात त्याने लग्न केले, आपले आयुष्य कसे गेले याचा विचारही केला. आपल्याला आत्महत्येपासून कोणी रोखेल याची वाटही पाहिली. आपल्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची सोयही लावली. क्रूरतेचा करुण अंत झाला. एवढ्या लोकांना यमसदनी धाडणारा हिटलर आपल्या शेवटच्या क्षणांत मृत्यू पाहून घाबरला होता. त्याचा उजवा हात थरथरत असे. तो थांबवण्यासाठी त्याला डावा हात आधाराला द्यावा लागे. अडखळत चालणे सुरू झाले होते. असा अंत होईल अशी त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement