SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दागिने न मिळाल्याने नवरीने लग्न मोडले, भोजनाचा खर्चही वसूल केला..!

आतापर्यंत आपण नवरदेव रुसल्याच्या अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. त्यातून बऱ्याचदा लग्न मोडण्यापर्यंत वाद टोकाला गेलेले आहेत. लग्नानंतरही हुंडाबळीच्या घटना आजही दिसतात.

मात्र, मनाजोगती वस्तू न मिळाल्याने कधी नववधू रुसल्याचे वा त्यातून थेट लग्न मोडल्याचे ऐकिवात नव्हते. पण, ही कसरही भरून निघाली. लग्नात कमी दागिने मिळाल्यानं नाराज झालेल्या नवरीबाईनं थेट लग्नालाच नकार दिल्याची घटना समोर आली आहे.

Advertisement

ही घटना आहे, उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील पट्टी ठाणा क्षेत्रातील. मनाजोगे दागिने न मिळाल्यानं नवरीनं थेट लग्नालाच नकार दिला. त्यामुळे नवरीच्या दारातूनच नवरदेवाला आपली वरात रिकाम्या हाताने माघारी घेऊन जावी लागली.

हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर नवरदेवाकडील लोकांना भोजनासाठी आलेल्या खर्चातील आर्धी रक्कमही भरावी लागली.

Advertisement

सुलतानपूरच्या मीरपूर क्षेत्रातील प्रतापपूर येथून नवरदेवाची वरात प्रतापगड येथील पट्टी ठाणा येथे आली होती. वरातीमध्ये आलेल्या लोकांनी भोजनही केलं. नंतर लग्नाचे साहित्य नवरीच्या घरी पाठवण्यात आले. मात्र, त्यात केवळ एकच दागिना होता.

त्यामुळे नवरीकडची मंडळी नाराज झाली. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद जास्तच वाढल्यानं नवरीनेच समोर येत थेट लग्नाला नकार दिला. त्यानंतर नवरीविनाच वरात माघारी परतली.

Advertisement

50 टक्के खर्च देण्याची तयारी

पट्टी ठाण्यात गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली. त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने नवरीकडच्या लोकांनी भोजनाचा खर्च मागितला. भोजनासाठी १ लाख ४० हजार रुपये खर्च झाला होता. मुलाकडच्या लोकांनी यातील 50 टक्के खर्च देण्याची तयारी दाखवली. नवरदेवाच्या घरच्यांनी 60 हजार रुपये दिले. उर्वरित 10 हजार रुपये नंतर देण्याचं सांगून ते निघून गेले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement