SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 29 एप्रिल 2021

मेष : नोकरी-व्यवसायात बढती-बदलीचे योग आहेत. विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबतीत अडचणी येण्याची शक्यता आहे. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

Advertisement

वृषभ : आजचा दिवस आपल्याला भाग्योद्याच्या दृष्टीने अनुकूल आहे आज नोकरीनिमित्त परदेशगमन होण्याचा योग आहे. संतती संबंधी चिंता जाणवतील. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल.

मिथुन : आज आपल्या घरातील त्रीवर्गाच्या उन्नतीस अनुकूल दिवस आहे. परदेशात असलेल्या आपल्या संततीची आज भेटघडेल. तुमचा सरळ स्वभाव आणि मजबूत व्यक्तिमत्व या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडाल.

Advertisement

कर्क : भागिदारीत व्यवसाय करणार्यांचे कार्यक्षेत्र वाढण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आज आपल्याला संततीच्याउत्कर्षाची बातमी समजेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. आपल्या मतांचा आदर केला जाईल.

सिंह : व्यावसायिक मतभेद टाळावेत. आज आपले विचार प्रकट करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तिचे म्हणणे ऐकून घ्या. आज आपल्याला अनपेक्षित लाभ संभवतात. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल.

Advertisement

कन्या : आज आपल्याला घरगुती कामानिमित्त प्रवासयोग करावे लागतील. संततीच्या उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिणवस अनुकूल आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. शेजार्यांचे सहकार्य लाभेल.

तूळ : आपल्या हातून घडलेल्या सुंदर कलाकुसरीला सभोवतालच्या व्यक्तिंकडून उत्तम दाद मिळेल. आपले कलाक्षेत्र वाढण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या कामात मित्रपरिवाराचा सल्ला घेऊ नका. उधारी उसनवारी वसूल होईल.

Advertisement

वृश्चिक : आपली कामे करताना सावधगिरी बाळगा, वरिष्ठांना बोलण्यास संधी देऊ नका. व्यावसायिक दृष्टीकोनातून प्रगतीकारक घटना घडतील. घरात गोडीगुलाबीचे वातावरण राहिल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

धनू : आज आपल्या संततीच्या नोकरीसंबंधीची सुवार्ता आपल्या कानी येईल. तीर्थक्षेत्राला भेट देण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. आज आपल्या हातून धार्मिक कार्ये घडतील. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.

Advertisement

मकर : व्यावसायिक क्षेत्रात आपल्या मतांचा प्रभाव पडेल. त्यावर तात्काळ अंमलबजावणी होईल. याचा उपयोग आपले कार्यक्षेत्र वाढण्यासाठी होईल. आपल्या सहकार्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल.

कुंभ : आपले काम स्वतःच पुर्ण करा. आपले अंदाज अचूक ठरतील. नोकरीत वरिष्ठांकडून आपल्यावर कामाची जबाबदारी सोपविली जाईल. धाडसी निर्णय घेतले जातील.

Advertisement

मीन : घरासंबंधीची कर्तव्ये पार पाडाल. मित्रपरिवाराकडून आपल्याला विविधप्रकारचे लाभ होतील. कल्पनाशक्तीला वाव देणार्या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement