SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ शहरातील तीन हजार कोरोना रुग्ण झालेत बेपत्ता, मोबाईलही ‘स्विच ऑफ’

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना केंद्र व राज्य सरकार पुरते हतबल झाले आहे. त्यात नागरिक सहकार्य करीत नसल्याने अडचणीत भर पडते आहे.

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना कुठे रेमडीसीव्हरचा काळाबाजार सुरु आहे, तर कुठं ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. रोज नवनवे ‘कारनामे’ समोर येत असताना आता अशीच खळबळजनक बातमी समोर आली आहे.

Advertisement

कर्नाटकमधील बंगळुरू शहरातील तब्बल 3000 कोरोना रुग्ण अचानक बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे फोनही बंद असल्याने रुग्णाचा शोध घेणे प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.

कर्नाटकचे महसूलमंत्री ए. अशोक यांनीही कोरोना रुग्ण बेपत्ता झाल्याच्या बातमीस दुजोरा दिला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. अशोक म्हणाले, “आम्ही लोकांना मोफत औषधं देत आहोत, ज्यामुळे कोरोना नियंत्रणात येइल; पण या लोकांनी आपले मोबाइल फोन बंद केले आहेत. त्यांनी आपल्याबाबत कुणाला माहितीही दिली नाही आहे. असे बहुतेक रुग्ण गंभीर स्थितीत रुग्णालयात पोहोचतात आणि आयसीयू बेड शोधतात. सध्या असंच होत आहे.”

Advertisement

“बंगळुरूतील कमीत कमी तीन हजार लोकांनी आपले फोन बंद केले आहेत. आपलं घर सोडून कुठेतरी दुसरीकडे गेले आहेत. आम्हाला माहिती नाही, ते कुठे गेले आहेत. परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे”, असं त्यांनी सांगितलं.

कर्नाटकात कोरोना भयावह
कर्नाटकात कोरोना भयावह रूप घेत आहे. मंगळवारी (ता.२७ एप्रिल) राज्यात 30 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले. बंगळुरू शहरातच 17000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित सापडले. राज्यात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दोन लाख एकट्या बंगळुरूत आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख पार गेली आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement