संजय राठोड यांच्या प्रकरणानंतर शिवसेनेसाठी अजून एकदा अडचणी वाढलेल्या दिसत आहेत. तिकडे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीचे सहा मंत्री येत्या चार महिन्यांमध्ये अडचणीत येणार असल्याचे सांगितले असून हिंगोली येथील आमदाराच्या ऑडिओ क्लिपने देखील महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे.
हिंगोली येथील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ‘वीस मिनिटात गाडी आली नाही तर, रॉकेल टाकून पेटवून देईल’ या आशयाचे वक्तव्य केले असून, ही कॉल ची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा राजकारण्यांची अरेरावी समोर येत आहे. 2 तास गाडीसाठी वाट पाहिल्यानंतर त्यांनी गाडी पाठवणाऱ्या व्यक्तीवर राग व्यक्त केल्याचे या ऑडिओ क्लिपमधून दिसून येत आहे.
काय आहे या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये जाणून घ्या
गाडी पाठवणारी व्यक्ती : हॅलो
आमदार संतोष बांगर : हा साहेब
गाडी पाठवणारी व्यक्ती : हा दादा, गाडी आता इथून निघाली थाळीगावहून… ती गाडी अर्ध्या-पाऊण तासात पोहोचेल बघा तिथे तुम्हाला.
आमदार संतोष बांगर : लय बोर व्हायले बघा मी, इमानदारीने… तुम्हाला खोटं सांगत नाही मी.. एकही गाडी 108 ची चालू देणार नाही… मी सांगतो उभ्या गाडीत रॉकेल टाकून फुकून देईन
गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा.. दादा..
आमदार संतोष बांगर : काय दादा-दादा… जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला जायचंय आणि तुम्ही म्हणता की गाडी नाही. दोन घंटे झाले वाट पाहून राहिलो
गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा बरोबर आहे, पण दोन गाड्या नांदेडला गेल्या. थाळीगावहून गाडी पाठवतो.
आमदार संतोष बांगर : दोन तासापासून राहते का?
गाडी पाठवणारी व्यक्ती : बरोबर आहे
आमदार संतोष बांगर : मी तुम्हाला सांगतो, मला 20 मिनिटात गाडी पाहिजे तिथे, नाहीतर उद्यापासून… गाडी मी पेट्रोल टाकून फुकून देईन पाहा.
गाडी पाठवणारी व्यक्ती : काहीच प्रॉब्लेम नाही
आमदार संतोष बांगर : मला लवकरात लवकर गाडी पाहिजे. दोन तास झाले मी वेट करुन राहिलो तुमच्या गाड्यांची
गाडी पाठवणारी व्यक्ती : मी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलंय
आमदार संतोष बांगर : काय धंदा झाला का… दोन घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हद्द झाली. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष… त्याला संभाजीनगरला न्यायचं आहे. त्याची तब्येत बराबर नाही.. आणि तुम्ही असे करायला लागले. चुकीचं नाहीतर काय तुमचं?
गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा बरोबर आहे
आमदार संतोष बांगर : मला काही सांगू नका.. ताबडतोब 20 मिनिटात गाडी आली पाहिजे तिथे… दोन घंट्यापासून थाळीगावहून गाडी येते?
गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा आली आहे गाडी आता तिथं
आमदार संतोष बांगर : बाकीची कामं सोडा आणि ती कामं करा आधी
गाडी पाठवणारी व्यक्ती : हो दादा, गाडी पाठवतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs