मोबाईल ही काळाची गरज झालेली असली तरीदेखील व्हॉट्सॲप ही अक्षरशः सवय झाली आहे. दोन लोकांना किंवा एका व्यक्तीला तिच्या नातेवाईकांशी कनेक्ट ठेवण्यासाठी व्हॉट्सॲप सारखे दुसरे माध्यम सध्या तरी अस्तित्वात नाही. व्हॉट्सॲपला पर्याय असला तरीदेखील लोकांना व्हॉट्सॲपची झालेली सवय आणि वाटणारी आपुलकी ही इतर ॲप बाबत वाटत नाही.
व्हॉट्सॲप नेहमीच वेगवेगळे फिचर त्याच्या युजर्ससाठी आणत असते. काही काळापूर्वी डिसअपिअरिंग मेसेजेस चे नवीन फिचर व्हॉट्सॲपने लोकांसाठी आणले. यात तुमचे पर्सनल आणि ग्रुप वर असलेले चॅट्स एका आठवड्यानंतर आपोआप गायब होतात. यासाठी तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे. याचा वापर तुमच्यापैकी बरेच लोक करतही असतील.
आता याच फीचरला मॉडीफाय करून आणखी एक फीचर समोर येत आहे. मेसेजेस आपोआप गायब होणे, म्हणजेच डिसअपिअर होणे, हे तुम्ही आता 24 तासाच्या कालावधीतही करू शकता. म्हणजे तुम्ही ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय समोर दिसतील. यामध्ये 24 तासात तुम्हाला हा मेसेज डिलीट करायचा आहे किंवा एखादा चॅट क्लिअर करायचा आहे, किंवा सात दिवसांसाठी तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे हे आता यूजर ठरवू शकतात.
अँड्रॉइड, आय ओ एस, व्हॉट्सॲप वेब यासारख्या विविध पर्यायात तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर, तुमच्यासाठी हे फिचर लवकरच येणार आहे. यावर अजूनही काम चालू असून जेव्हा तपासणी व्यवस्थित होईल, त्यानंतर हे फिचर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये दिसू शकेल.
यात एखादा महत्त्वाचा मेसेज तुम्हाला ठेवायचा असेल तर त्याचा स्क्रीन शॉट काढून किंवा तो मेसेज डिसअपिअर होण्याच्या आधीच इतर कोणालातरी फॉरवर्ड करून तुम्ही तो जपून ठेवू शकता. ग्रुप वर मेसेज कधी डिसअपिअर व्हावेत हे ग्रुप ॲडमिन ठरवू शकतो. ग्रुप मधील मेंबरला त्याचा चॅट कधी डिलीट करायचा आहे किंवा मग ग्रुप मधील मॅसेजेस त्याच्यासाठी कधी डिलीट करायचे आहेत हे ठरवण्यासाठी देखील ऑप्शन देण्याचा सध्या विचार चालू आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs