लग्नासाठी काय पण… म्हणणाऱ्या कोरोनाग्रस्त नवरदेवाने केले असे काही की सोशल मीडियावर आहे त्याचीच चर्चा!
भारत हा संस्कृतीचे स्थान आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट साजरी करण्यासाठी कोणतेही कारण लागत नाही. भारतीय लोक हे नेहमीच छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद साजरे करणारे आहेत. मात्र, कोरोनाने हा आनंद साजरा करण्याचा उत्साह काही प्रमाणात कमी केला आहे.
मात्र, काही जण परिस्थिती चे गांभीर्य लक्षात न घेता वागतात आणि त्याची चर्चा होते. असेच काहीसे मध्यप्रदेशातील रतलाम या गावात झाले आहे. भारतात कोणत्याही गोष्टीची कशी अतिशयोक्ती होते हे यावरून सिद्ध होते.
लग्न ठरले, तयारी झाली मात्र नवरदेव निघाला कोरोना पॉजिटिव्ह! या काळात लग्न कसे होणार? आधीच निर्बंध सक्तीचे आहेत. लॉकडाऊन आहे. मग काय करायचे? मियाँ बिवी राजी तो क्या करेगा कोरोना… अशी स्थिती झाली.
नवरदेव पीपीई किट घालून मांडवात आला. नवरीच्या हातातल्या बांगड्यांची जागा ग्लव्हजने घेतली, पायात बूट, अंगात शालू ऐवजी पीपीई किट, मुंडावळ्या नाही मात्र तोंडाला मास्क! भटजी, फोटोग्राफर सगळ्यांच्या तोंडाला मास्क, हातात ग्लव्ज आणि अंगात पीपीई किट!
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. नवरा नवरीने सगळी परवानगी घेऊन, खबरदारी घेऊन लग्न केले. याचे कौतुक झाले आणि एवढ्या काळात लग्नाची इतकी घाई का? हौस तरी झाली का? उगच काहीतरी अशा अनेक चर्चा कमेंट्स मध्ये रंगल्या!
#WATCH | Madhya Pradesh: A couple in Ratlam tied the knot wearing PPE kits as the groom is #COVID19 positive, yesterday. pic.twitter.com/mXlUK2baUh
Advertisement— ANI (@ANI) April 26, 2021
मात्र, लग्न झाले. हे बरोबर की चूक याचे समर्थन आम्ही करू शकत नाही. या अनोख्या लग्नाची चर्चा सगळीकडे आहे हे मात्र निश्चित!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs