SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिल्लीहून आणलेल्या ‘त्या’ बॉक्समध्ये नेमकं काय होतं? खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले…

भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला आहे. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. राजकारण अथवा श्रेयासाठी नव्हे तर, गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. मात्र, सरकार कारवाई करेल म्हणून गोपनीयता बाळगली, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. यातील प्रत्येकी 100 इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिली.

Advertisement

खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीहून आणलेल्या बॉक्समध्ये नेमके काय होते? त्यांनी ही इंजेक्शन्स खरंच आणली असतील तर ती कोठे आणि कोणाला वाटली हे जाहीर करावे,’ अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना डॉ. विखे यांनी उत्तर दिले आहे.

यावर डॉ. सुजय विखे म्हणाले की..

Advertisement

माझी बांधिलकी नगर जिल्ह्याशी आहे. येथील लोकांना उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. त्या बॉक्‍समध्ये काय होते, याबाबत ज्यांना शंका आहे, त्यांनी अधिकृतपणे बोलावे. मी त्यांना व्यक्तिशः उत्तर देईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना त्या बॉक्‍समध्ये काय होते, ते मोकळे होते की त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट होते, हे मी त्यांना सांगेन.

जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी याचे उत्तर देणे लागत नाही असे स्पष्टीकरण डॉ विखे यांनी दिले आहे. आम्ही फसवेगिरी केली असती, तर जिल्ह्याने 50 वर्षे आम्हाला साथ दिली नसती.

Advertisement

विखे म्हणाले की, आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही मदत घेतली. हे करत असताना गरिबांसाठी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर करत आहे.

खासदार विखे पाटील यांनी कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव, माहिजळगाव, कर्जत शहर आणि राशीन येथे भेट देत कोरोना संसर्गाबाबत आढावा घेतला. तसेच याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Advertisement

दरम्यान भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक निर्बंध असतानाही सुजय विखे यांनी हे औषध कोठून आणले, कोठे वितरित केले याची चौकशी करून हे काम बेकायदेशीररित्या झाल्याचे आढळून आल्यास साठा जप्त करून कारवाई व्हावी, अशी मागणी करणारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement