SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फॉर्च्युनर मधून विकले जातात या शेतकऱ्याचे वांगे; कोण आहे हा पठ्ठ्या? जाणून घ्या

कोरोना मध्ये शेती व्यवसायात असलेल्या लोकांना आणि त्यातल्या त्यात कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसान याला सामोरे जावे लागले आहे. देशभरामध्ये विविध क्षेत्रातील लोकांना आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागत आहे.

मात्र, शेतीविषयक बाबींमध्ये अडचणी मोठ्या प्रमाणावर या कारणासाठी येतात की, शेतमाल पटकन खराब होतो आणि तो वेळेत विकला गेला नाही तर आर्थिक नुकसानीबरोबरच अन्नधान्याचे नुकसान देखील मोठे असते.

Advertisement

म्हणजे ते अन्नधान्य ना कोणाच्या मुखात जाते, ना शेतकऱ्याला त्याचे दोन पैसे मिळतात. मात्र, आज आपण अशा शेतकऱ्यांची कहाणी पाहणार आहोत जो चक्क फॉर्च्युनर मधून वांगे विकतो.

हि कहाणी कोणत्या दुसऱ्या देशातील शेतकऱ्यांची नसून महाराष्ट्रातल्या आपल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आहे. डॉक्टर प्रताप पाटील असे या गावातील प्रगत शेतकऱ्याचे नाव आहे. ते जिल्हा बँकेचे संचालक देखील आहेत. आर आर आबा पाटील यांचे ते समर्थक म्हणून, पाटील साहेब असताना त्यांचे नावही भरपूर होते. आता संजय काकांचे समर्थक आहेत.

Advertisement

सेंद्रिय शेती आणि ऑरगॅनिक अन्न धान्यावर बड्या लोकांची किती उडी असते हे पारखून, त्यांनी आपल्या शिवारातील 2 एकरात वांगी लावली. पुण्याला हा माल पाठवून पैसे कमवावेत असा त्यांचा मानस होता.

लॉकडाऊनने त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले. पुण्यात वांगी गेली नाहीत तर काय झाले स्थानिक बाजारात तर ती विकली जाऊ शकतात. आपली लोकं ऑरगॅनिक भाज्या खातील असे वाटून त्यांनी तिथेच बाजारात विक्री करायला सुरुवात केली.

Advertisement

साधारणतः वांगी टोपलीत आणून लोक विक्रीस बसतात मात्र, यांची वांगी फॉर्च्युनरमध्ये येतात. 10 रुपये पावशेर, 40 रुपये किलो प्रमाणे विकली जातात. लोकांना भाजी शुद्ध मिळते वर फॉर्च्युनरमध्ये वांगी विकणारा शेतकरी पाहण्याचे कुतूहल ते वेगळेच!

प्रगत शेतकऱ्यांकडून अडचणीत मार्ग कसा काढावा हे शोधणे शिकावे तेवढे कमी आहे. मात्र, यात त्यांना इतर शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची जाणीव आहे. ही बाब त्यांची मुळं जमिनीत घट्ट रुजलेली आहेत ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement