आयपीएलच्या 14व्या पर्वातील 19 व्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने विराटसेनेचा विजयरथ रोखला. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात चेन्नईने बंगळुरुला 69 धावांनी पराभूत केले. या विजयासह चेन्नई गुणतालिकेत नंबर एकला पोहचली आहे. रविंद्र जडेजाने 28 बॉलमध्ये 62 धावांची वादळी खेळी केल्यानंतर 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन 3 विकेट घेतल्या.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रवींद्र जडेजा नावाच्या वादळात बंगळुरुची टीम उन्मळून पडली. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला या मोसमातील पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. कोहली भलेही हा सामना हरला परंतु त्याला दु:ख झालं नाही तर उलट त्याला आनंदच झाला आणि त्याच्या आनंदाचं कारण ठरला रवींद्र जडेजाचा बहारदार बॅटिंग परफॉर्मन्स! जडेजाने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या शानदार फटकेबाजीमुळे विराट त्याच्यावर खूपच खूश आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी ट्वेन्टी वर्ल्डकपवर विराटचं लक्ष आहे.
जडेजाच्या बॅटिंग परफॉर्मन्सवर कोहली खूश, म्हणाला..
“जाडेजाकडे क्षमता आहे. आज त्याने ती दाखवून दिली. मी त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंग परफॉर्मन्सने खूप खूश आहे. दोन महिन्यांनंतर तो भारतीय संघाकडून खेळेल. जेव्हा तुमचा मुख्य अष्टपैलू फलंदाज उत्तम कामगिरी करत आहे हे पाहून तुम्हाला निश्चित आनंद होईल. साहजिक मलाही आनंद झालाय. जेव्हा तो चांगला खेळतो आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो, तेव्हा त्याला रोखणं कठीण असतं साहजिक संधीही जास्त मिळतात. जाडेजाच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने मी खूप खूश आहे”, असं मॅच संपल्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला.
जडेजाने हर्षल पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये काढल्या 37 धावा
सामन्यातील 20 वी ओव्हर बंगळुरुचा पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेल टाकायला आला. हर्षलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हर्षलचा विश्वास दुणावलेला होता. जडेजाने सलग 4 सिक्स लगावले.
▪️ पहिला चेंडू – जडेजाने हर्षलचं षटकार मारून स्वागत केलं.
▪️ दुसरा चेंडू – षटकार
▪️ तिसरा चेंडू – जडेजाने तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. मात्र हा नो बोल देण्यात आला. त्यामुळे चेन्नईला 1 अतिरिक्त धाव मिळाली.
▪️ चौथा चेंडू – जडेजाने या पुढच्या चेंडूवर सलग चौथा सिक्स लगावला. यासह जडेजाने तुफानी अर्धशतक पूर्ण केलं.
▪️ पाचवा चेंडू – त्यानंतर जडेजाने 2 धावा घेतल्या.
▪️ सहावा चेंडू – त्यानंतर पुन्हा त्याने 5 वा सिक्स खेचला.
▪️ सातवा चेंडू – त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जडेजाने चौकार लगावला.
[videopress GyUyN7eX]
यासह जडेजाने 28 चेंडूत 5 सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा ठोकल्या. शून्यावर फलंदाजी करत असताना जीवदान लाभलेल्या जडेजाने बंगळुरूचा घाम काढला.
6 चेंडूत 6 षटकार
याआधी श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेतून बाहेर असताना ऑल राऊंडर रवींद्र जडेजाने नवा इतिहास रचला होता. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा टी-20 सामन्यात खेळताना त्याने 6 चेंडूत 6 षटकार ठोकून नवा विक्रम केला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs