SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गृहकर्ज देण्याआधी या 5 गोष्टींची तपासणी करतात बँका; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टी!

घर घेणे किंवा बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आज काल हे स्वप्न सत्यात उतरवणे देखील महाग झाले आहे. व्यवस्थित आणि प्रशस्त घर, चांगला परिसर, सर्व सोयी-सुविधा हे सगळं हवं असेल तर बक्कळ पैसे मोजावे लागतात. त्यावेळी बँकेचे गृहकर्ज कामी येते. परंतु, हे कर्ज घेण्यासाठी बँका काय काय तपासतात? कोणत्या गोष्टींची पुर्तता झाली असली तरच कर्ज मिळते? हे सर्व प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात. त्याचीच उत्तरे आज आपण जाणून घेऊ!

क्रेडिट स्कोर

Advertisement

तुम्हाला कर्ज कोणतेही घ्यायचे म्हणले तरी क्रेडिट स्कोर महत्वाची भूमिका बजावतो. गृहकर्जात सुद्धा ही बाब महत्वाची ठरते. तुमचा क्रेडिट स्कोर 750 च्या वर असायला हवा. तुमचा क्रेडिट स्कोर जास्त चांगला असेल तर, तुम्ही कर्ज फेडण्यास सक्षम आहात असे मानून तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते.

वय आणि नोकरीची वर्षे

Advertisement

गृहकर्ज हे जास्त काळ चालणारे कर्ज असते. ज्याचे वय कमी त्याला पटकन कर्ज देता येते कारण त्याच्याकडे नोकरीची वर्षे सुद्धा जास्त असतात. या अर्थी, तो व्यक्ती कर्ज फेडण्यास सक्षम असतो. त्याचे कर्जफेडीचे हफ्ते पगारावर अवलंबून असतात. त्याच्या पगाराच्या 50 टक्क्यांहून कमी बसतील असे हफ्ते आकारावे लागतात. त्यामुळे कर्जदाराचा पगार सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो. तुम्ही किती काळ एका ठिकाणी नोकरी करता यावर सुद्धा बँक तुमची विश्वासार्हता तपासते. यातून तुम्ही फसवेगिरी करून पैसे बुडवणार नाही याची खात्री बँकेला होत असते.

मालमत्तेचे योग्य मूल्यांकन

Advertisement

गृहकर्ज म्हणून संपत्तीच्या एकूण मूल्याच्या 85 टक्के बँका अनेकदा कर्ज देतात. अशा परिस्थितीत कर्ज देण्याच्या मालमत्तेच्या बाजारभावाव्यतिरिक्त, बँका इमारतीचे वय, सद्य स्थिती आणि बांधकाम गुणवत्तेचे देखील मूल्यांकन करतात. आपण ज्या मालमत्तेवर कर्ज घेत आहात त्या मालमत्तेस खूप उच्च रेटिंग दिलेली बँकेला वाटले तर त्याचे कर्ज बँक रद्द करते. योग्य मूल्यांकन झाले नाही तर कर्ज रद्द होण्याची भीती असते.

मालमत्ता मंजुरी

Advertisement

ज्या मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे ती स्थानिक प्रशासनाने मंजूर केली आहे की नाही याची देखील चौकशी बँक करते. योजनेच्या किंवा परवानगीच्या बाहेर बांधकाम असेल तर बँक कर्ज रद्द करते. बँका गृहकर्ज देण्याआधी बिल्डर कडून खातरजमा करून घेतात. त्यामुळे बांधकाम आणि बांधकामाची गुणवत्ता याचाही यावर परिणाम होतो.

मालमत्ता नवीन की जुनी?

Advertisement

तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी ज्या वेळी कर्ज घेतात. तेव्हा ती मालमत्ता बँकेकडे कर्ज फिटेपर्यंत तारण या स्वरूपात ठेवली जाते. त्यामुळे ती मालमत्ता नवी आहे की जुनी आहे? त्या मालमत्तेची गुणवत्ता काय आहे? मालमत्ता कशा स्थितीत आहे हे पाहणे बँकेची प्राथमिकता असते. नव्या मालमत्तेसाठी लगेचच कर्ज मिळते मात्र जुन्या मालमत्तेसाठी कर्ज मिळणे अवघड होते.

या काही प्राथमिक गोष्टी बँका कर्ज देण्याआधी आणि विशेषतः गृह कर्ज देण्याआधी पाहतात. याहूनही अधिक गोष्टींची माहिती तुम्हाला बँकेकडून सहज उपलब्ध होऊ शकते. मात्र गृहकर्ज देण्यासाठी या चार-पाच गोष्टी डोक्यात ठेवल्या तर नक्कीच गृहकर्जाची प्रक्रिया तुमच्यासाठी सोपी होईल, हाच या लेखाचा हेतू!

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement