SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

…म्हणून रुपयाच्या मूल्यात होतेय घसरण, वाचा नेमकी कारणं काय?

भारतात सुरु झालेले भारतीय रुपयाचे अवमूल्यन थांबताना दिसत नाही. अनेक राज्यांत कडक निर्बंध आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा रुततच चालला आहे. भारतीय चलनातील हा कमकुवतपणा आणखी काही काळ तरी कायम राहण्याची शक्यता आहे.

भारतीय रुपयाची किंमत 75 रुपयांची पातळी ओलांडत एवढा घसरला, की तुर्की, रशिया आणि ब्राझीलमधील सेंट्रल बँकांप्रमाणे ‘आरबीआय’नेही वेगळी भूमिका स्वीकारली. आर्थिक बाजारात एप्रिलमध्ये अस्थिरता होती. रुपयाचे मूल्य 1.5 टक्क्यांहून जास्त घसरले. या महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीदेखील अनुक्रमे 4.5 ते 3.3 टक्क्यांनी घसरले.

Advertisement

याउलट अमेरिकन डॉलर निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरला, तर एस अँड पी (S and P) 500 ने या महिन्यात 4 टक्क्यांचा नफा कमावला. लवकरच रुपया 76 ची पातळी ओलांडेल, असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडच्या रिसर्च अनॅलिस्ट-करन्सीच्या हीना नाईक यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती असल्याने परिणामी, एका अहवालनुसार, परकीय गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये भारतीय बाजारातून सुमारे 4,615 कोटी रुपये काढले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाने बाजारातील या खेळीत मोठी भूमिका बजावली. समितीने रेपो दर 4 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल बँकेनेदेखील कर्जावरील खर्च करण्याकरिता, तसेच अर्थव्यवस्थेतील सुधारण्यासाठी आर्थिक वर्ष 2022 मधील पहिल्या तीन महिन्यांत 1 लाख कोटी रुपयांपर्यंतचे बाँड खरेदी करण्याचे आश्वासन दिले. याआधी 6 एप्रिल 2021 रोजी 10 वर्षांच्या भारतीय बेंचमार्कचे उत्पन्न 6.12 टक्क्यांपर्यंत होते. रिझर्व्ह बँकेने कर्ज खरेदीचे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर, 10 वर्षांच्या भारतीय बेंचमार्कचे उत्पादन 2 दिवसातच 6.01 टक्क्यांपर्यंत घसरले.

Advertisement

दुसरीकडे, भारतीय रुपयाची किंमत 75 रुपयांची पातळी ओलांडत एवढा घसरला, की तुर्की, रशिया आणि ब्राझीलमधील सेंट्रल बँकांप्रमाणे ‘आरबीआय’नेही वेगळी भूमिका स्वीकारली. रुपयाचे मूल्य वाढण्याची अपेक्षा असलेल्या अनेक ट्रेडर्सनी सुरुवातीला पाठींबा दिला. मात्र, धोरण जाहीर झाल्यानंतर, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी त्यांच्या काही पोझीशन्स सोडून दिल्या आणि यामुळे रुपयाच्या मूल्यात घसरण झाली. एप्रिल-2021 मध्ये रुपया हे ‘आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन’ असे संबोधले गेल्याचे हीना नाईक यांनी नमूद केले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement