SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्टेट बँकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘क्लेरिकल केडर फार्मासिस्ट’ पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. ‘एसबीआय’च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 67 पदे भरली जाणार आहेत.

‘क्लेरिकल केडर फार्मासिस्ट’ पदासाठी अर्ज करु इच्छितात, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची वेबसाईट sbi.co.in/careers यावर भेट द्यावी. ही पदभरती D.Pharma आणि B. Pharma अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहे. या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत 3 मेपर्यंत आहे.

Advertisement

या तारखा लक्षात ठेवा!

▪️अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 13 मार्च 2021
▪️अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 मे 2021
▪️एसबीआय फार्मासिस्ट परीक्षेची तारीख – 23 मे 2021

Advertisement

कोण करू शकेल अर्ज?
क्लेरिकल केडर फार्मासिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एसएससी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी (डी. फार्म) किंवा (बी फार्मा / एम फार्मा / फार्मा डी) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीची पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. फार्मासिस्टमध्ये डिप्लोमा पदवी असलेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा. जे अर्ज करणार आहेत ते sbi.co.in/careers वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. फार्मासिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 17900 ते 47920 रुपयांपर्यंत पगार मिळेल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement