कोरोना महामारीने जगाला ग्रासलेले असताना, महाराष्ट्रात सुद्धा निर्बंध वाढवले आहेत.
प्रादुर्भाव जास्त असलेल्या इतर राज्यांमध्ये लॉकडाऊन तर महाराष्ट्रात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध असताना गरिबांसाठी अन्नपाणी मिळणे गरजेचे झाले आहे.
मागील लॉकडाऊन मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरजूंना दरडोई 5 किलो गहू अथवा तांदूळ असा मोफत पुरवठा होत होता.
नोव्हेंबर 2020 पासून ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून देशातील परिस्थिती पुन्हा चिंताजनक झाल्याने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात 5 किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेचा 80 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार 26 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs