SpreadIt News | Digital Newspaper

नाशिकनंतर आणखी एक दुर्घटना, विरार येथील रुग्णालयास आग लागून १३ रुग्णांचा मृत्यू

नाशिक येथील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमाववे लागले होते. ही घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. चार मजली रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Advertisement

दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले. इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आज (ता.23) पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती, की अतिदक्षता विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांत हलविण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना घडल्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी आलेले नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचे काम सुरु केले.

Advertisement