SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

देशात छापली होती शून्य रुपयाची नोट! कोणी, कशासाठी केला तिचा वापर?

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यावर ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नवीन नोटा आल्या. मात्र, एक हजाराची नोट चलनातून गायब झाली ती कायमचीच!

एक हजाराऐवजी दोन हजाराची नोट हाती आली. या गुलाबी नोटेने सुरुवातीला उत्सुकता वाढवली असली, तरी बँक सोडल्यानंतर दोन हजाराची नोट सुट्टे करताना घाम फुटतो. आपण आतापर्यंत एक, दोन, पाच, १०, २०, ५०, १००, ५००, एक आणि दोन हजार रुपयांच्या नोटा पाहिल्या असतील.

Advertisement

परंतु, आपल्या देशात शून्य रुपयाचीही नोट छापली गेली होती.. असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. शून्य रुपयांची नोट चलनात कशी आली होती, त्याची ही गोष्ट..!

वर्ष होतं 2007. दक्षिण भारतात एक ‘5th पिलर’ नावाची एनजीओ संस्था आहे. या संस्थेने ही शून्य रुपयांची नोट छापली होती. तमिळनाडू आधारित 5व्या स्तंभाच्या या स्वयंसेवी संस्थेने शून्य रुपयांच्या कोट्यवधी नोटा छापल्या. हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये या नोटा छापल्या गेल्या होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (आरबीआय) त्यात कोणताही सहभाग नव्हता.

Advertisement

नोटा छापण्यामागील हेतू

वास्तविक, ही शून्य रुपयाची नोट छापण्यामागे लोकांना भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरूद्ध जागरूक बनविणे, हा हेतू होता. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत शून्य रुपयांच्या नोटेला शस्त्र बनवले होते. वेगवेगळ्या भाषांमध्ये छापलेल्या या नोटांवर असे लिहिले होते, की ‘जर तुम्हाला कोणी लाच मागितली असेल, तर ही नोट द्या आणि आम्हाला ती बाब कळू द्या..!’

Advertisement

संघटनेने शून्य रुपयांची नोट छापून भ्रष्टाचाराविरूद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. एकट्या तमिळनाडूमध्ये 25 लाखाहून अधिक नोटा वितरित केल्या गेल्या. देशभरात सुमारे 30 लाखांच्या नोटा वितरित केल्या गेल्या.

‘5th पिलर’ संस्थेचे संस्थापक विजय आनंद यांनी या मोहिमेची सुरुवात केली. त्यांनी आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनपासून प्रत्येक चौका-चौकात आणि बाजारपेठेत शून्य रुपयांच्या नोटांचे वितरण केले होते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement