SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अंधारात चमकणारा मोबाईल ‘लाँच’, जाणून घ्या आगळे-वेगळे फीचर्स!

अनेकदा घरात मिट्ट काळोख असताना, आपल्याला मोबाईल नेमका कुठे ठेवलाय, ते आठवत नाही. अंधारात चाचपडत आपण तो शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ठेच लागून पडतो. अनेकांसोबत असा प्रकार झालेला असेल. मात्र, आता काळजी नको. कारण, अंधार असला, तरी मोबाईलच तुम्हाला सांगेल, की तो कुठे आहे? कारण असा एक स्मार्टफोन आता बाजारात आला आहे.

स्मार्टफोनच्या दुनियेत रोज नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होतात. वेगवेगळ्या फीचर्स आणि किंमतीसह लॉन्च होणाऱ्या फोनवर ग्राहकांच्या उड्याही पडतात. मात्र, तुम्ही जर अंधारात सापडणार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर रिअलमी कंपनीने Realme-8 Pro हा Illuminating Yellow कलर व्हेरिएन्ट फोन भारतात ‘लॉन्च’ केला आहे.

Advertisement

कंपनीने Realme 8 Pro हा स्मार्टफोन यापूर्वीच भारतात लॉन्च केला होता. मात्र, त्यातील Illuminating Yellow कलर रिलीज केलेला नव्हता. मात्र, आता कंपनीने हा कलरही भारतात लॉन्च केला आहे. ब्लॅक आणि ब्लू रंगासह आता येलो कलरही ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे, याचे बॅक पॅनर अंधारातही चमकते. त्यामुळे हा फोन ग्राहकांच्या पसंतीस पडला आहे.

Realme 8 Pro स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Advertisement

डिस्प्ले – 6.4 इंच फुल एचडी + (1080×2400 पिक्सल) सुपर AMOLED
प्रोसेसर – ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन ७२०
स्टोरेज – 6 आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी
बॅटरी – 4500mAh (50W सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट)

कॅमेरा – एक क्वाड रियर कॅमरा. यात 108 मेगा पिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8+2+2 मेगा पिक्सलचा सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.

Advertisement

किंमत – Illuminating Yellow कलर मॉडेल दोन व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 17 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 18 हजार 99 रुपये आहे.

कधीपासून उपलब्ध – 26 एप्रिल २०२१

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement