SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लॉकडाऊन: महाराष्ट्रात आजपासून 1 मे पर्यंत कोणते कडक निर्बंध? वाचा..

राज्यात काल राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व नियम 22 एप्रिल रोजी संध्याकाळी 8 वाजेपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.

काय आहेत कडक निर्बंध?

Advertisement

▪️ राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये फक्त 15 टक्के कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील. कोरोनासंबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आलं आहे.

▪️ अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र 13 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना 15 टक्के किंवा 5 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या क्षमतेने कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement

▪️ प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असेल.

▪️ लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये 2 तासांमध्येच व 25 लोकांच्या उपस्थितीत पूर्ण करावे लागतील, अन्यथा संबंधित कुटुंबाला 50 हजार रुपये दंड तर हॉलवर कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात येईल.

Advertisement

▪️ बसेस सोडून खासगी प्रवासी वाहतूकीसाठी एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना अत्त्यावश्यक कारणासाठी प्रवासाची परवानगी असेल.

▪️ आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणाऱ्यांवर 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

Advertisement

▪️ खासगी बसमध्ये एकूण आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल.

▪️ राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला 50 टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असेल. उभं राहून प्रवास करण्यास मनाई असेल.

Advertisement

▪️ लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश, आयकार्ड तपासून तिकिट मिळेल.

▪️ विशिष्ठ ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना हातावर शिक्का मारण्यापासून किंवा होम क्वारंटाईन करण्यापासून सूट देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement