कोरोनामुळे राज्यात अतिशय दयनीय परिस्थिती होत आहे, असे असताना आर्थिक, कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढले आहे. टाळेबंदीमुळे सामान्यांच्या कामावर परिणाम झाला आहे आणि कामामुळे पैशांची कमतरता पडू लागली आहे. यामुळे घरात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सोलापुरात घटस्फोटासाठी 91 अर्ज?
मिळालेल्या माहीतीनुसार सोलापुरात अवघ्या 2 महिन्यांत घटस्फोटासाठी तब्बल 91 अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत. कोरोना महामारीमुळे मागील वर्षीच्या कडक लॉकडाऊनचे परिणाम आता सोलापुरात दिसत आहे. काही दिवसापासून अनेक कठोर निर्बंधदेखील राज्य सरकारने लागू केले आहेत. या अशा परिस्थितीत लॉकडाऊनदरम्यान अनेकांची कामे हातातून निघून गेली तर अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले.
लॉकडाऊनमुळे काम मिळणे अवघड तर काहींना कामावरून काढून टाकल्याने रोजगार बुडाले, इतकेच नव्हे तर घरातील आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. त्यामुळे कौटुंबिक कलहाला खतपाणी मिळाले. संसारामध्ये 2 कमीत कमी 2 वेळच्या जेवणासाठी काहीतरी लागतं, कुटुंबासाठी खूप गोष्टींना पैशाची साथ ही हवीच असते. याचाच अभाव असल्याने असंख्य कुटुंबात वादाला पेव फुटतात.
लॉकडाऊनमुले पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत गेले व अनेकांनी सुखाने थाटलेला संसार मोडण्याचा विचार केला आणि एकमेकांपासून विभक्त होण्याचा पर्याय निवडला. त्यातूनच सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयात 1 जानेवारी ते 1 मार्च 2021 या केवळ दोनच महिन्यांत शंभरी गाठत तब्बल 91 जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केले आहेत.
लॉकडाऊन काळात पुन्हा कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे न्यायनिवाडा करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने ही सर्वच प्रकरणे प्रलंबित आहेत. फक्त यापूर्वीच्या प्रलंबित प्रकरणांतील 42 जोडप्यांचा घटस्फोट मात्र झाला आहे.
‘अहंकार’ महत्वाचं कारण असू शकतं का?
कोरोनाच्या या महामारीत कौटुंबिक वातावरण तणावमुक्त नसलं की धक्का बसणारे काही निर्णय आपण घेऊ शकतो, म्हणून वाद हा क्षणिक असतो या कठीण परिस्थितीतुन मार्ग काढायला शिका. आज पती-पत्नींमध्ये जो समन्वय व सामंजस्य असायला हवे ते राहिले नसल्याने दोघांमधील मतभेद वाढत जाऊन प्रकरणे थेट कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटापर्यंत जात आहेत. अहंकार दुखावणे हेसुद्धा त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे कौटुंबिक न्यायालयातील वकील सरोजिनी तमशेट्टी यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs