कोरोना महामारीने अनेक क्षेत्रात मंदी आणली आहे. शिक्षण, नोकरी सर्व ठिकाणी परिस्थिती अभूतपूर्व झाली आहे. मनोरंजन क्षेत्रात सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. या वर्षभरात आपल्यापैकी अनेकांनी थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघणे नक्कीच मिस केले असणार. अशात ओटीटी प्लॅटफॉर्म देवदूताप्रमाणे धावून आला आहे.
वेबसिरीजच्या दुनियेत अनेक कलाकार जादू करताना दिसत आहेत. वेबसिरीजचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग या काळात तयार झाला. हॉलिवूड मध्ये वेबसिरीज किंवा दुसऱ्या भाषेत असणाऱ्या वेबसिरीज नेहमीच भारतातील प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय असत.
या कोरोना काळात भारतात सुद्धा अनेक उत्तम वेबसिरीज प्रदर्शित झाल्या. या आठवड्यात सुद्धा दोन उत्तम वेबसिरीज आपल्या भेटीला येणार आहेत. सोनी लिव्ह वर 23 एप्रिल रोजी काठमांडू कनेक्शन ही वेबसिरीज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या वेबसिरीज मध्ये आपल्याला एक पत्रकार आणि त्याला आलेल्या काठमांडूच्या एका रहस्यमयी फोन कॉलची कहाणी पाहायला मिळणार आहे. या फोन कॉल नंतर त्याचे आयुष्य आणि या वेबसिरीजची कथा कशी फिरते हे दाखवण्यात आलेले आहे. अमित स्याल आणि अक्षा पांडेय हे मुख्य भूमिकेत दिसतील. वेबसिरीजच्या ट्रेलरलाच प्रचंड मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
एम एक्स प्लेयर वर ‘हॅलो मिनी 3’ ही वेबसिरीज 23 एप्रिल ला प्रदर्शित होणार आहे. गोल्डी बहल आणि ऍपलोज एंटरटेनमेंट यांनी याची निर्मिती केली आहे. यात मिनी ची कथा पुढे दाखवण्यात येणार आहे. हा एक सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे. अनुजा जोशी आणि मृणाल दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs