Take a fresh look at your lifestyle.

कदाचित ही अखेरची सकाळ म्हणत केली होती मृत्यूपूर्वी फेसबुकवर पोस्ट; मुंबईतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू!

0

कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील सर्वच कर्मचारी सेवा देताना आपण गेल्या वर्षभर बघत आहोत. सामान्य माणूस म्हणून आपण डॉक्टरकडे देव असल्यासारखे पाहतो. आपली कोणतीही अडचण सोडवण्यासाठी डॉक्टर हा एकमेव मार्ग आहे असे आपल्याला वाटत असते. अनेकदा पेशंटला काही झाले तरी देखील नातेवाईक डॉक्टरांना दोषी धरतात आणि त्यांच्यावर नाही नाही ते आरोपही करतात.

मात्र, गेल्या वर्षभरामध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स यांनी आपल्या जीवाची बाजी लावत कोरोना युद्धात आपले योगदान दिले आहे. भारतासारख्या देशामध्ये कोरोना ची आजची परिस्थिती ही अक्षरशः वैद्यकीय सेवा-सुविधा कोलमडेपर्यंत येऊन पोहोचली आहे.

Advertisement

याचा फटका खुद्द डॉक्टरांनाही बसत असल्याचे चित्र सध्या आहे. मुंबई येथील शिवडी मधील महिला वैद्यकीय अधिकारी मनीषा जाधव यांचा सोमवारी झालेला मृत्यू हा त्याचेच एक उदाहरण आहे.

शिवडी येथील क्षयरोग विभागाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव यांनी मृत्यूपूर्वी एक दिवस आधी केलेली फेसबुक वरची पोस्ट मात्र सध्या मोठ्या चर्चेत आहे. त्यांना जणू मरण दिसून आले होते, या प्रमाणे त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी ‘ही माझी कदाचित शेवटची सकाळ असेल’, या आशयाची पोस्ट केली होती. पुढे त्यांनी ‘शरिर जाते मात्र आत्मा राहतो’ अशा आशयाचे विधान देखील केलेले आहे.

Advertisement

त्यांचे सहकारी आणि ओळखीतले लोक या पोस्टवरून अजूनच गहिवरून येत असल्याचे बोलत आहेत. गेल्या वर्षभरात कोरोना काळात त्यांनी मोलाचे योगदान देत हा लढा लढला होता. त्यानंतर त्यांना न्यूमोनिया चे निदान झाले. यामध्येच कोरोना रिपोर्ट देखील पॉझिटिव आला. त्यांच्यावर योग्य ते सगळे उपचार चालू होते. मात्र, सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

“डॉक्टर देखील माणूस आहे. त्यांना देखील भावना आहेत आणि मुळात जीव आहे. परिस्थिती अत्यंत बिकट आहे, सर्वांनी काळजी घेऊन राहावे. डॉक्टरांना देखील भीती वाटत आहे. हतबल वाटणे काय असते ते आता कळत आहे. रुग्णांना घरीच उपचार देण्याची वेळ आली आहे. तुम्ही सर्वजण घरात राहा. काही होत नाही हा संभ्रम काढून टाका. तरुण लोक व्हेंटिलेटर वर आहेत ही अवस्था कधीच नव्हती.” या आशयाचा व्हिडिओ डॉक्टर तृप्ती गिलाडा यांनी टाकला आणि सर्वांना डॉक्टरांच्या मानस्थितीबाबत कळले.

Advertisement

सर्वांनी ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. काळजी घ्या आणि सतर्क राहा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच ब्रेकिंग न्यूज WhatsApp वर मिळवण्यासाठी स्प्रेडइट जॉइन करा अगदी मोफत, त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

Leave a Reply