SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू!

नाशिक – नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या २३ पैकी तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.

रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा आता पूर्ववत झाला असून, या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

Advertisement

महापालिकेच्या जुने नाशिक भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज (ता. २१ एप्रिल) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती.

तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया गेला. गळती बंद करण्यासाठी तांत्रिक पथकाबरोबरच अग्निशमन दलाचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Advertisement

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सुमारे दीडशे रुग्ण दाखल झालेले होते. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने 22 रुग्णांना जीव गमवावा लागला. शिवाय इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. काही रुग्णांना ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत होते.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात आले.

Advertisement

कोविड रुग्णालय असतानाही रुग्णाचे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशामुळे रुग्णालय परिसर हादरून गेला होता.

याबाबत माजी मंञी चंद्रकांत पाटील म्हणाले, की हे प्रकरण दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आतापर्यंत अशा ८-९ घटना घडल्या आहेत. हे सरकार ‘राम भरोसे’ चालले आहे. आम्ही सतत बोलत आहोत, पण कोणताही प्रश्न असो, प्रत्येक वेळी सरकार हे प्रश्न ‘डायव्हर्ट’ करते आहे.

Advertisement

प्रवीण दरेकर म्हणाले, की या घटनेसाठी पूर्णतः महापालिका आयुक्त जबाबदार आहेत. गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनचा गोंधळ सुरु आहे. यंत्रणा आज गतीने उभे करण्याची गरज आहे. आता तरी या घटनेतून आपण धडा घेतला पाहिजे.

शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयाला तातडीने भेट दिली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement