Take a fresh look at your lifestyle.

🎯 दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

0

✒️ महाराष्ट्रात लॉकडाऊनचे संकेत :
राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्री अस्लम शेख यांनीही संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यात पुढील 15 दिवसासाठी कडक लॉकडाऊन जाहीर केले जाणार आहे.

✒️ सोन्या-चांदीच्या दरात घसरण : 
राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 305 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा दर 10 ग्रॅमला 46,756 रुपयांवर आला. चांदीचा दरही 113 रुपयांनी घसरला. त्यामुळे चांदी 67,810 रुपये प्रतिकिलोवर आली. सलामीच्या सत्रात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 23 पैशांच्या मजबुतीसह 74.64 वर व्यापार करताना दिसला.

Advertisement

✒️ टॉस जिंकून मुंबईची बॅटिंग :
चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा सलामीवीर क्विंटन डी कॉक स्वस्तात बाद झाला.

✒️ राहुल गांधी यांना कोरोनाची लागण : 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली. राहुल गांधी म्हणाले, की माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.

Advertisement

✒️ परदेशी लशींचा मार्ग सुकर :
रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस लवकरच भारतात येत आहे. तर फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतात येण्याच्या तयारीत आहेत. परदेशातून आयात होणाऱ्या लसीवरील १० टक्के आयात कर रद्द करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

✒️ मोदींचा पोर्तुगाल दौरा रद्द :
देशात कोरोनाची परिस्थिती बिघडत चालल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालच्या दौरा रद्द केला आहे. भारत व युरोपीय युनियन यांच्या मे महिन्यात पोर्तुगालमध्ये परिषद होणार आहे. त्यासाठी मोदी पोर्तुगाल दौऱ्यावर जाणार होते.

Advertisement

✒️ कोरोनाबाबत तीन आठवडे निर्णायक : 
कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, असे मत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

✒️ कोयना धरण परिसरात भूकंप : 
कोयना धरण परिसरात मंगळवारी दुपारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यामध्ये किकली गावाच्या पूर्वेस सात किलोमीटरवर होता, असे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले. मात्र, दोन्ही भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

Advertisement

✒️ नेट परीक्षा लांबणीवर : 
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी ‘नीट-पीजी’ परीक्षा लांबणीवर टाकली गेली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता, आता नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली.

✒️ तमिळनाडूत लसीचा सर्वाधिक नाश :
तमिळनाडूमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या लसींपैकी तब्बल १२.१० टक्के लसींचे डोस वाया गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा, तिसऱ्या क्रमांकावर पंजाब, चौथ्या क्रमांकावर मणिपूर, तर पाचव्या क्रमांकावर तेलंगण राज्याचा सामावेश आहे.

Advertisement

✒️ सोलापूर विमानतळ परिसराला आग : 
सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळ परिसराला सोमवारी (ता.19) रात्री ११.३० वाजता अचानक आग लागली. विमानतळाच्या तिन्ही बाजूने आग पसरत गेली. वाळलेले गवत आणि वाऱ्यामुळे आग चांगलीच भडकली.

✒️ आव्हाड यांच्या पत्नीचे आंदोलन : 
ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ठाणे महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, ऋता आव्हाड यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते.

Advertisement

✒️ झारखंडमध्ये लॉकडाऊन जाहीर : 
कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असल्याने झारखंडमध्ये लॉकडाऊन करण्यात आलेय. 22 ते 29 एप्रिल या कालावधित ही लॉकडाऊन असेल.

✒️ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन : 
कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा निरोप घेतला.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच ब्रेकिंग न्यूज WhatsApp वर मिळवण्यासाठी स्प्रेडइट जॉइन करा अगदी मोफत, त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement

Leave a Reply