राखी सावंत ही बॉलिवूड मध्ये आपले आयटम सॉंग्स आणि वायफळ बडबड यासाठी प्रसिद्ध आहे. तिची सतत होणारी आणि मोडणारी लग्नं देखील कायम चर्चेत असतात. पब्लिसिटी साठी ती अशा गोष्टी करते असेही बोलले जाते.
तिला फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही. मात्र, ती खूप कष्ट करून बॉलिवूड मध्ये आलेली आहे हे ही कोणी नाकारू शकत नाही. तिच्या कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आहे. एक व्यक्ती म्हणून तिच्या घरच्यांसाठी ती कायम झटत असते.
तिची आई काही दिवसांपूर्वी कॅन्सर ने त्रासलेली आहे हे माध्यमांसमोर आले होते. बिग बॉस 14 या शो मध्ये सुद्धा राखी तिच्या आईच्या ट्रीटमेंट साठी पैसे गोळा व्हावेत म्हणून गेली होती.
सलमान खान नेहमी गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीला धावतो. विशेषतः बॉलिवूड मधील मंडळींच्या कुटुंबात काही झाले तर तो नेहमी खंबीर साथ देतो.
राखीच्या आईची परिस्थिती कळल्यावर त्याने त्यांच्या उपचारांची जबाबदारी घेतली होती. तो त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटला देखील होता. राखीच्या आईवर योग्य आणि परिणामकारक उपचार व्हावेत म्हणून सलमान आणि सोहेल खान सतत झटत होते.
आज राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती फुटपाथवर डोकं टेकवून सलमानचं नाव घेत ढसाढसा रडत आहे. यात वाईट काही नसून, ते तिचे आनंदाश्रू आहेत.
पाहा व्हायरल व्हिडिओ :
AdvertisementView this post on InstagramAdvertisement
तिच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली असून, त्या व्यवस्थित आहेत त्यामुळे तिला आनंद अनावर झाला आहे. ती सलमान आणि सोहेल चे आभार मानत माझ्यासाठी ते देवदूत आहेत असेही बोलत आहे.
हे केवळ त्या दोघांमुळे शक्य झाले असल्याचे देखील ती सांगत आहे. या व्हिडीओ मधून तिने सलमान विषयीची तिची कृतज्ञता सिद्ध केली आहे. राखी पब्लिसिटी साठी नेहमी काही न काही करत असते मात्र हा तिचा भावूक व्हिडीओ प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs