SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘तिच्यासाठी काय पण’ करायला गेला, प्रेमाचा शेवट जेलमध्ये झाला!

प्रेम आंधळं असत, असं म्हणतात. कारण, तो तिच्या किंवा ती त्याच्या प्रेमात पडल्यावर काहीही करायला तयार होतात. त्यातही तिने एखादी गोष्ट करण्यास सांगिल्यावर तो नाही म्हणूच शकत नाही. ‘तुज्यासाठी काय पण..’ तो अगदी काहीही करण्यास तयार होतो..

हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, प्रेमीयुगुलांचा एक किस्सा. आतापर्यंत आपण प्रेमवीरांच्या अनेक जोड्या पहिल्या असतील. मात्र, ही जोडी जरा वेगळी आहे. एका दवाखान्यातून सुरु झालेला त्यांच्या प्रेमाचा शेवट अखेर जेलमध्ये झाला.. असे काय केले होते या जोडीने? कशामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली..? चला तर पाहू या..

Advertisement

ती नर्स. मूळची सिवनी (नागपूर) येथील रहिवाशी. तर तो बांधकाम ठेकेदार. भोपाळ येथून नर्सिंग कोर्स केल्यावर ती जामठा येथील गायकवाड पाटील परिसरातील कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम करू लागली. तेथेच तिचे बांधकाम ठेकेदार असणाऱ्या तरुणावर प्रेम जडले..

सध्या कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने राम्डेसीवर इंजेकशनला मोठी मागणी आहे. कितीही पैसे मोजून नातेवाईक आपल्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून त्याचा मोठा काळाबाजार होत आहे.

Advertisement

रेमडीसीव्हर इंजेकशनमधून पैसे कमविण्याची आयडिया तिला सुचली. त्यासाठी तो कधीही मदतीला हजर होता. तिने त्यालाही आपल्या योजनेत सहभागी करून घेतले. कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णाचे रेमडीसीव्हर ती चोरू लागली. हे इंजेक्शन गरजू लोकांना विकण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

तिच्यासाठी तोही हे काम आनंदाने करीत होता. मात्र, ‘कानून के हाथ लंबे होते है..’ हे दोघेही विसरले. रेमडीसीव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची बाब वाठोडा पोलिसांना समजली. त्यात या दोघांचा सहभाग असल्याचे समोर आले.

Advertisement

वाठोडा येथील स्मशानभूमीत बाईकवर बसून इंजेकशन विकत असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळ ५ इंजेक्शन पोलिसांना सापडले. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. अखेर तीही पोलिसांचा जाळ्यात अडकली. अशा प्रकारे त्यांच्या प्रेमाचा शेवट पोलीस ठाण्यात झाला.

ज्योती अजित असे तिचे, तर शुभम सत्यनिवास अर्जुनवार असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement