SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अजय देवगण करणार ओटीटी प्लॅटफॉर्म वर आगमन; ही असणार वेबसिरीज!

अजय देवगण नेहमीच विविधांगी आणि विविधरंगी भूमिकांसाठी ओळखला जातो. वेगवेगळे चित्रपट आणि प्रत्येक प्रकारच्या भूमिकांमधून तो नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेला आहे. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील त्याने आपले नशीब आजमावले आहे.

नुकताच ‘द बिग बुल’ हा चित्रपट त्याने अभिषेक बच्चन ला संधी देऊन ओटीटी प्लॅटफॉर्म वर आणला. त्याची भूमिका मात्र यात नव्हती. आता त्याच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असलेला त्याचा चाहता वर्ग त्याला ‘रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ या वेबसिरीज मधून पडद्यावर पाहू शकतो.

Advertisement

ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित केली जाणार आहे. या वेब सीरीजची शूटिंग लवकरच मुंबईत सुरु होणार आहे. एंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टुडिओ मिळून या वेब सीरिजची निर्मिती करणार आहे.

लवकरच, या वेबसिरीजचे शूटिंग मुंबईत सुरू होणार असून, सध्या लॉकडाऊन मुळे फक्त याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. एक तत्पर पोलीस ऑफिसर म्हणून तो यात भूमिका साकारणार आहे.

Advertisement

या आधी सिंघम मधून त्याने अशीच भूमिका केली होती. आता यात तोचतोचपणा येऊ नये म्हणून तो काय वेगळी मेहनत घेतो हे आपल्याला पडद्यावर पाहायला मिळेलच!

या आधी त्याने कधीच ओटीटी प्लॅटफॉर्म वर काम केलेले नाही. टीव्ही, सिनेमा, वेबसिरीज हे तीनही माध्यम वेगवेगळे आहेत, यात काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आता हा अनुभव सुद्धा अजय आपल्या प्रेक्षकांसाठी खास बनवेल यात वाद नाही.

Advertisement

या आधी त्रिभंगा वेबसिरीज मधून त्याने आपल्या होम प्रोडक्शनद्वारे निर्मिती क्षेत्र पाहिले. रेणुका शहाणे यांनी त्या वेबसिरीजचे दिग्दर्शन सुद्धा केले. काजोल आणि मिथिला पालकर यांनी सुद्धा यात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच ब्रेकिंग न्यूज WhatsApp वर मिळवण्यासाठी स्प्रेडइट जॉइन करा अगदी मोफत, त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement