SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या मात्र होणार!

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते म्हणाले, कोरोनामुळे पूर्ण वर्षभर शाळा भरलेल्या नाहीत. अनेक राज्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असून, त्याची तारीख काही दिवसात जाहीर केली जाईल.

Advertisement

राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत दिले.

राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत.

Advertisement

ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय उद्या (ता.21) जाहीर करतील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

📣 अशाच ब्रेकिंग न्यूज WhatsApp वर मिळवण्यासाठी स्प्रेडइट जॉइन करा अगदी मोफत, त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement